MSEDCL Build India Infra Award: महावितरणला ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड’; सौर कृषिवाहिनी 2.0 ला राष्ट्रीय मान्यता

16 हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पाची दखल; नवी दिल्लीत श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
MSEDCL Build India Infra Award
MSEDCL Build India Infra AwardPudhari
Published on
Updated on

नगर: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16 हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 ची अंमलबजावणी सुरू आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली.

MSEDCL Build India Infra Award
Rahuri Fake Milk Racket: राहुरीतील बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश; 31 नावे समोर

बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डसाठी रस्ते, बंदरे, वीज, शहरी वाहतूक, पाणी आदी आठ क्षेत्रांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात येते. देशातील सुमारे 145 प्रकल्पांचे मूल्यमापन करून निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखालील 25 सदस्यांच्या निवड समितीने पुरस्कारांसाठी प्रकल्पांची निवड जाहीर केली.

MSEDCL Build India Infra Award
Shrirampur Land Fraud Case: उंदिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

या समितीने महावितरणची देशपातळीवर पुरस्कारासाठी निवड केली आहे. महावितरणला नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 24) 2026 च्या बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‌‘बिग इम्पॅक्ट‌’ पुरस्कारानेही गौरव

सर्वाधिक अत्याधुनकि स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‌‘बिग इम्पॅक्ट‌’ पुरस्काराने मुंबईत नुकताच गौरव करण्यात आला. मुंबई महापालिकेचे महापौर रितू तावडे व अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news