Kopargaon Election: कोपरगावात शिवसेनेत महासंग्राम; नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत

काळे-कोल्हे गटांसोबतच दोन्ही शिवसेना आमने-सामने; झावरे व मोरे यांच्यात चुरस, अपक्ष वहाडणेही रिंगणात
Kopargaon Election
Kopargaon ElectionPudhari
Published on
Updated on

कोपरगाव: काळे-कोल्हे गटात नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली असतानाच दोन्ही शिवसेनेने स्वतंत्ररित्या उमेदवार दिल्याने कोपरगावाच्या सत्तेसाठीची लढत रंगतदार झाली आहे. उबाठा सेनेला ‌‘जय महाराष्ट्र‌’ करणारे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करत नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन भरल्याने दोन शिवसेनेत वर्चस्वाची लढाई रंगली आहे.

Kopargaon Election
School Time Change: ग्रामीण भागात बिबट्यांचा वाढता धोका; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या वेळेत बदल?

उबाठा सेनेने नगराध्यक्षपदासाठी सपना भरत मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करताना पक्षाचा एबी फॉर्म देताच राजेंद्र झावरे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर शनिवारी झावरे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय वहाडणे यांनी अपक्ष तर काळे गटाकडून काका कोयटे व कोल्हे गटाकडून पराग संधान यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोपरगावच्या सत्तेसाठी पंचरंगी लढत निश्चित झाली आहे.

Kopargaon Election
Leopard attack: गोधेगाव–भालगावमध्ये बिबट्याचा वावर; नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीची लाट

झावरेंचे निर्णायक पाऊल

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कोपरगावात ‌‘पॉलिटिकल वादळ‌’ उठलं आहे. आघाडी तुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला गळती लागली असताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी निर्णायक पाऊल टाकले आहे.उबाठा सेनेतून बाहेर पडत झावरे यांनी शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली.

Kopargaon Election
District Bank Chairman Election: जिल्हा बँकेत सत्तांतराची चिन्हे? चेअरमन निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

कैलास जाधव यांचाही राजीनामा

राजेंद्र झावरे यांच्या पाठोपाठ कैलास जाधव यांनीही उबाठा सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदाचा तसेच रिक्षा सेना संघटनेतील जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. झावरे यांच्यासोबत तेही शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. जाधव हे नगरसेवक पदाची निवडणूक लढणार असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजेंद्र झावरे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश रविवारी मुंबईत होत आहे.

नितीन औताडे, जिल्हाध्यक्ष, शिंदे सेना.

Kopargaon Election
Leopard Attack: निंबळक शिवारात बिबट्याचा हल्ला; आठ वर्षांचा मुलगा गंभीर

कोपरगावच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने निश्चित झाला आहे. शहरातील राजकीय परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. बंडखोरांना रोखण्यासाठी कठोर कारवाई हाती घेण्यात येईल.

सचिन शिंदे, जिल्हाध्यक्ष, उबाठा सेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news