Karanji Disaster Affected Protest: प्रशासनाच्या आश्वासनानंतर करंजीतील आपत्तीग्रस्तांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित

फेब्रुवारीत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय; प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन मागे
Karanji Disaster Affected Protest
Karanji Disaster Affected ProtestPudhari
Published on
Updated on

करंजी: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आपत्तीग्रस्त कुटुंबांनी विविध मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन पुढील महिन्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन स्थागित करण्यात आले.

Karanji Disaster Affected Protest
Nagawade Sugar Factory Politics: नागवडे साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मेघा औटी; संचालक प्रशांत दरेकर यांचा राजीनामा

शुक्रवारी सकाळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी करंजीत येऊन आपत्तीग्रस्त कुटुंबाशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाथर्डी येथे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक गेऊन आपत्तीग्रस्तांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Karanji Disaster Affected Protest
Sangamner Illegal Sand Mining: संगमनेरमध्ये अवैध वाळू उपशावर कडक कारवाई; सराईतांवर ‘मोक्का’ची तयारी

करंजी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, सरपंच रफिक शेख, सुभाष आकोलकर, सुनील अकोलकर, बाळासाहेब पावशे, बाबासाहेब गाडेकर, भाऊसाहेब मोरे, राजेंद्र पारे, शिवाजी पारे, बाळासाहेब साखरे, मुरलीधर मोरे, महमद मणियार, बाबासाहेब खोसे, शेफिक शेख, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

Karanji Disaster Affected Protest
Ahilyanagar Drugs Case: ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

यावेळी तहसीलदार डॉ. नाईक म्हणाले, नदीपात्रा जवळील अधिग्रहण केलेली संपूर्ण जागा निश्चित करण्यात येईल, नदीपात्रावर कोणीही खासगी पूल उभारू नये. याबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल, उत्तरेश्वर मंदिराजवळ नवीन पूल उभारण्याबाबत व संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा केली जाईल, घोरदरा पाझर तलावाचा सांडवा विरुद्ध बाजूने घेण्यासाठी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, काही आपत्तीग्रस्तांना दुसऱ्या टप्प्याचे देखील मदत पोहोचलेली आहे.

Karanji Disaster Affected Protest
Illegal Drug Injection Sale: तोफखाना परिसरात नशेची इंजेक्शने विक्री करणारा तरुण रंगेहाथ अटकेत

उर्वरित आपत्तीग्रस्तांना निश्चितपणे मदत देण्याची शासनाची भूमिका राहील. आपत्तीग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्याबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, जलसंधारण, पंचायत समिती या सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पाथर्डीला घेऊन आपत्तीग्रस्तांच्या प्रश्नावर निश्चितपणे तोडगा काढला जाईल. त्यामुळे प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे करंजी येथील आपत्तीग्रस्तानी आंदोलन स्थगित केल्याचे सुभाष आकोलकर, बाबासाहेब गाडेकर बाळासाहेब पावसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news