Illegal Drug Injection Sale: तोफखाना परिसरात नशेची इंजेक्शने विक्री करणारा तरुण रंगेहाथ अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 11 हजारांचा औषधसाठा जप्त
Drug
DrugPudhari
Published on
Updated on

नगर: तोफखाना परिसरात नशेसाठी वापरल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 11 हजार 613 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रोहित रघुनाथ वंगार (वय 25, रा. बागडपट्टी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Drug
Kukadi Canal Damage: कुकडी कालव्याची वितरिका फुटली; २५ एकर शेतीपिकांचे मोठे नुकसान

शुक्रवारी पहाटे पोलिस पथकास माहिती मिळाली की, सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक तरुण कुरिअरने मागवलेली नशेची औषधे विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावून संशयित रोहित वंगार याला ताब्यात घेतले.

Drug
Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव; मुंबईतून ठरणार अंतिम निर्णय

त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत ‌’मेफेनटर्माइन सल्फेट‌’ या इंजेक्शनच्या 37 बाटल्या मिळून आल्या. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास बंदी असतानाही, आरोपी कोणताही परवाना नसताना त्याची विक्री करत होता. या इंजेक्शनच्या वापरामुळे मानवी आरोग्यास आणि जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Drug
Weekly Market Road Issue: खरवंडी कासारचा आठवडे बाजार रस्त्यावरच; प्रवाशांचे हाल

याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश शिवनाथ लबडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. संशयित आरोपी रोहित बंगार याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने ती औषधे दिल्ली येथील सलमान नावाच्या व्यक्तीकडून कुरिअरद्वारे मागवल्याचे सांगितले.

Drug
Rabi Crop Disease Maharashtra: नगर तालुक्यात ढगाळ हवामानाचा फटका; रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना आणि इतर ग्राहकांना नशा करण्यासाठी ही विनाबिल इंजेक्शन विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी श्रीरामपूर, संगमनेर येथे नशेचे इंजेक्शनचा मोठा साठा पकडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news