Jeur ST Bus Stop: जेऊरला आता सर्व एसटी बस थांबणार; प्रवाशांना मोठा दिलासा

अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसगाड्यांना थांबा देण्याच्या सूचना; विद्यार्थी, महिला व वृद्धांची गैरसोय दूर होणार
ST Bus
ST Buspudhari photo
Published on
Updated on

नगर तालुका: अहिल्यानगर– छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जेऊर (बा.) येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने लांब पल्ल्याच्या, तसेच मार्गावरून धावणाऱ्या सर्व एसटी बसगाड्यांना जेऊर येथे थांबा देण्याच्या सूचना राज्य परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे जेऊर व परिसरातील विद्यार्थी, महिला, वृद्ध, तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ST Bus
Jamkhed Sautada Highway Encroachment: जामखेड-सौताडा महामार्गावरील अतिक्रमणे हटवा; रस्ते हद्द व मध्यरेषा निश्चित करा

जेऊर येथे बसथांबा असतानाही अनेक बसगाड्या थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच नागरिकांना विविध कामांसाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व इतर शहरांकडे जाताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः सकाळच्या वेळेस शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आणि रात्रीच्या वेळी परतीच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.

ST Bus
Ganesh Mandal Permission: गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा; जुन्या २७२ मंडळांना ५ वर्षांची मुदतवाढ

याबाबत निवृत्त पोलिस अधिकारी भानुदास हसनाळे यांनी गांभीर्याने लक्ष वेधत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य परिवहन विभागाच्या अहिल्यानगर विभागाने संबंधित आगारांना जेऊर येथे प्रवासी व विद्यार्थी चढ-उतार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी आता मार्गी लागली आहे.

ST Bus
Kanhobawadi School Student Enrollment: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कान्होबावाडी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले

चालक-वाहकांनी नियम पाळणे गरजेचे

जेऊर येथे बस थांबविण्याच्या सूचना झाल्यानंतर आता संबंधित बसगाड्यांच्या चालक-वाहकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. बसथांब्यावर प्रवासी किंवा विद्यार्थी उभे असताना बस न थांबण्याची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news