Kanhobawadi School Student Enrollment: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कान्होबावाडी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले

अवघे तीन विद्यार्थी असल्याने शिक्षण विभागाची पाहणी; पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू
Kanhobawadi School Student Enrollment
Kanhobawadi School Student EnrollmentPudhari
Published on
Updated on

करंजी: कान्होबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा निर्धार तेथील ग्रामस्थांनी आज केला. तीन विद्यार्थी आणि दोन शिक्षिका या ‘पुढारी’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने बैठक घेतली.

Kanhobawadi School Student Enrollment
Bull Population Decline: बैलांची संख्या ४० हजारांनी घटली; शेतकऱ्यांच्या दावणीत ट्रॅक्टरचीच ‘राजा’गिरी!

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी सचिन राख यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत शिक्षिकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या शैक्षणिक कामाची सविस्तर माहिती घेतली.

Kanhobawadi School Student Enrollment
Shevgaon Dam Repair: शेवगाव तालुक्यातील ५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी मंजूर; ७४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

दिवसभरात केंद्रप्रमुख रामदास बोंबले यांनी दोनदा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत ऊहापोह केला. त्याचबरोबर मुख्याध्यापक व सहशिक्षिका यांनी देखील शाळेमध्ये वेळेवर आले पाहिजे, शाळा वेळेवर भरली व सुटली पाहिजे याबाबत सक्त सूचना केल्या. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सूचित केले.

Kanhobawadi School Student Enrollment
Dharmaveer Gad: पेडगावच्या धर्मवीर गडाला अखेर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा!

करंजीचे उपसरपंच अर्जुन अकोलकर व पालकांनी शाळेला भेट देऊन पटसंख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा देठे व सहशिक्षिका मीना खेत्रे यांच्यासह दोन विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news