Jamkhed Sautada Highway Encroachment: जामखेड-सौताडा महामार्गावरील अतिक्रमणे हटवा; रस्ते हद्द व मध्यरेषा निश्चित करा

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; संयुक्त मोजणी व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी
Jamkhed Sautada Highway Encroachment
Jamkhed Sautada Highway EncroachmentPudhari
Published on
Updated on

जामखेड: शहरातून जाणाऱ्या जामखेड-सौताडा या राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५४८ डी)वरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवून महामार्गाची अधिकृत रस्ते हद्द आणि मध्यरेषा तातडीने निश्चित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Jamkhed Sautada Highway Encroachment
Ganesh Mandal Permission: गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा; जुन्या २७२ मंडळांना ५ वर्षांची मुदतवाढ

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार रस्ते हद्दीत नवीन ढाबे, खानावळी व व्यावसायिक बांधकामांना प्रतिबंध, तसेच अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना आहेत. नगरविकास विभागानेही १० ऑगस्ट रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. मात्र, या निर्देशांची केवळ कागदोपत्री नोंद न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Jamkhed Sautada Highway Encroachment
Kanhobawadi School Student Enrollment: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कान्होबावाडी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले

महामार्गाची मध्यरेषा व रस्ते हद्द निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, महसूल विभाग आणि जामखेड नगरपरिषद यांच्या संयुक्त उपस्थितीत मोजणी करावी. समर्थ रुग्णालय ते बीड कॉर्नर, बीड कॉर्नर ते खर्डा चौक, तसेच नगरपरिषद हद्दीतील सर्व बाधित भागांची पाहणी करून अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांची यादी तयार करावी. संबंधित परवाने व ना हरकत प्रमाणपत्रांचेही पुनरावलोकन करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

Jamkhed Sautada Highway Encroachment
Bull Population Decline: बैलांची संख्या ४० हजारांनी घटली; शेतकऱ्यांच्या दावणीत ट्रॅक्टरचीच ‘राजा’गिरी!

जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दलामार्फत संपूर्ण महामार्गाची पाहणी करून अपघातप्रवण ठिकाणे, वाहतूक अडथळे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अहवाल तयार करावा. अंतिम हद्द निश्चित करताना सध्याची रस्त्याची रुंदी नव्हे, तर मंजूर सविस्तर प्रकल्प अहवाल, रस्ते हद्द, भविष्यातील रुंदीकरण आणि भारतीय रस्ते मानकांचा विचार करावा, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Jamkhed Sautada Highway Encroachment
Shevgaon Dam Repair: शेवगाव तालुक्यातील ५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी मंजूर; ७४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

संयुक्त मोजणी, अतिक्रमणांची पाहणी आणि संबंधित परवान्यांचे पुनरावलोकन याबाबत प्रशासन कोणती कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि जामखेडच्या भविष्यातील विकासाचा विचार करून प्रशासनाने या प्रकरणात कालबद्ध कारवाई करावी. महामार्गाची अंतिम हद्द व अतिक्रमणांची यादी सार्वजनिक करून केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा. शासन परिपत्रकाची अंमलबजावणी कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसली पाहिजे.

अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news