Ganesh Mandal Permission: गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा; जुन्या २७२ मंडळांना ५ वर्षांची मुदतवाढ

नव्या १०० मंडळांचे अर्ज दाखल; १३ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

नगर: शहरात बाप्पांच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका प्रशासाने गणेशोत्सवासाठी पूर्वतयारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना मंडपउभारणी, मिरवणूक, ध्वनिक्षेपकाचा वापर, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा आदींसाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. महापालिकेने जुन्या २७२ मंडळांच्या परवान्यांना पाच वर्षांकरिता मुदतवाढ दिली आहे. नव्याने शंभर अर्ज प्राप्त झाले असून, येत्या दोन दिवसांत पडताळणी करून त्यांनाही परवानगी देण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Kanhobawadi School Student Enrollment: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कान्होबावाडी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले

शहरातील गणेश मंडळांना महापालिका प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत यासाठी आता काही परवान्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. महापालिकेच्या ‘amcfest’ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या संदर्भातील व वीजजोडणी संदर्भातील परवानगी मिळणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Bull Population Decline: बैलांची संख्या ४० हजारांनी घटली; शेतकऱ्यांच्या दावणीत ट्रॅक्टरचीच ‘राजा’गिरी!

तसेच, अग्निशमन, पोलिस प्रशासनाची परवानगी मिळणार आहे. शहरातील मंडळांसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ झाला असून, आतापर्यंत शंभर मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. नव्या मंडळांना १३ सप्टेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज सादर करता येणार आहेत. महापालिका प्रशासनाने जुन्या २७२ मंडळांना पाच वर्षांकरिता मुदतवाढ दिली आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Shevgaon Dam Repair: शेवगाव तालुक्यातील ५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी मंजूर; ७४८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

त्यामुळे या मंडळांना धावपळ करण्यासाठी गरज नाही. प्रशासन त्या मंडळांच्या जागेची पाहणी करणार आहे. नव्याने परवागी घेणाऱ्या गणेश मंडळांना मंडपउभारणी, सार्वजनिक ठिकाणाचा वापर, वीजजोडणी, अग्निशमन विभागाचे ना हरकत, वाहतूक शाखा पोलिस, ध्वनिक्षेपकाचा वापर असे परवाने आवश्यक आहेत.

Ahilyanagar Municipal Corporation
Dharmaveer Gad: पेडगावच्या धर्मवीर गडाला अखेर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा!

मंडळांनी नियमांचे पालन करावे

  • कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी.

  • ध्वनिक्षेपकाच्या नियमांचे पालन करावे.

  • परवानगी दिलेल्या वेळेतच ध्वनिक्षेपकाचा वापर करावा.

  • रस्ते आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • मंडप सुरक्षित पद्धतीने उभारावा.

  • अग्निसुरक्षेची आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत.

  • विद्युत तारा आणि जोडणी सुरक्षित ठेवावी.

  • मिरवणुकीसाठी निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करावे.

  • प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करावे.

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार कार्ड, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी, माेबाईल क्रमांक, मंडपाचा स्थळ नकाशा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news