Jeur Health Centre: जेऊर आरोग्य केंद्रावर पाच महिन्यांत १० हजारांहून अधिक रुग्ण; ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी

१६ गावांचा भार; प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची सेवा
Jeur Health Centre
Jeur Health CentrePudhari
Published on
Updated on

शशिकांत पवार

नगर तालुका: ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाला दिवसेंदिवस चांगली गती मिळत आहे. जेऊर आरोग्य केंद्रात गेल्या पाच महिन्यांत तब्बल दहा हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतल्याने आरोग्य केंद्रावरील नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि परिसरातील आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Jeur Health Centre
Ahilyanagar School Ragging: अहिल्यानगरच्या नामांकित शाळेत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; १० ते १२ विद्यार्थ्यांकडून वर्गमित्राला अमानुष मारहाण

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १६ गावांचा समावेश आहे. या गावांमधून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्राथमिक उपचारांसोबतच कुटुंब कल्याणाच्या १०४ शस्त्रक्रिया, दोन पुरुष नसबंदी, १७ प्रसूती, बालकांचे लसीकरण, विविध आजारांच्या रुग्णांच्या रक्त तपासण्या, तसेच आयुष्मान भारत आरोग्य खाते उघडण्याचे कामही येथे प्रभावीपणे सुरू आहे. एप्रिल २०२६पासून येथे पाच महिन्यांत तब्बल दहा हजारांवर रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

Jeur Health Centre
Ahilyanagar District Bank Politics: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘कुकडी’च्या जप्तीने खळबळ; राहुल जगतापांची वाट बिकट?

जेऊर उपकेंद्रातही तीन प्रसूती झाल्या आहेत. आरोग्य केंद्रातील ऑनलाइन कामकाजातही उल्लेखनीय प्रगती झाली असून, आयुष्मान भारत आरोग्य खाते उघडण्याच्या कामात जिल्ह्यात अव्वल कामगिरी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उपचारासोबतच आरोग्यविषयक विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व डॉ. शंकर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी कामकाज करीत आहेत.

Jeur Health Centre
Akole Ashram School: अकोल्यातील आश्रमशाळेची दुरवस्था; विद्यार्थी चटईवर, शुद्ध पाण्याचा अभाव, महिला अधीक्षिकाही नाही

छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत हे केंद्र असल्याने महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठीही केंद्र तातडीच्या उपचाराचा आधार ठरते. कोरोना काळात आरोग्य केंद्राकडे स्वतःची सुसज्ज इमारत नसतानाही उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा सुरू ठेवली होती. आता केंद्रासाठी सुसज्ज इमारत उभी राहिली असून, आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्याअंतर्गत उपकेंद्रे कार्यरत असून, चिचोंडी पाटील येथे ग्रामीण रुग्णालय आहे. जेऊरची वाढती रुग्णसंख्या, १६ गावांचा समावेश, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण आणि प्रसूतीसह विविध आरोग्यसेवांची वाढती गरज लक्षात घेता येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Jeur Health Centre
Shrigonda Lemon Price: श्रीगोंद्याच्या लिंबाला ‘पिवळे सोने’चे दिवस; घाऊक बाजारात १५० रुपये किलोचा भाव

जेऊर आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास येथे तज्ज्ञ डॉक्टर, अधिक परिचारिका, प्रयोगशाळा सुविधा, प्रसूती व शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साधनसामग्री, तसेच इतर सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. रुग्णांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार असून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना त्याचा लाभ होईल.

बाजीराव आवारे, प्रशासक, इमामपूर

तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रे, चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालय आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सातत्याने दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध मनुष्यबळ व सुविधांचा प्रभावी वापर करून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण रुग्णांना वेळेवर उपचार, प्रसूतीसेवा, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.

डॉ. विनोद काकडे, तालुका आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news