Ahilyanagar School Ragging: अहिल्यानगरच्या नामांकित शाळेत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; १० ते १२ विद्यार्थ्यांकडून वर्गमित्राला अमानुष मारहाण

किरकोळ वादातून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; शिक्षकांना सांगितल्यास पुन्हा मारण्याची धमकी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Ragging
RaggingPudhari
Published on
Updated on

नगर/सावेडी: महाविद्यालयातील रॅगिंग प्रमाणे शहरातील नामांकित विद्यालयातही रॅगिंगचे प्रकार घडत असून, एखाद्या विद्यार्थ्याला लक्ष करून दहा ते बारा विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याध्यापकांच्या जुजबी कारवाईला टारगट विद्यार्थी दाद देत नाहीत. त्यामुळे टारगट विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पोलिसांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

Ragging
Ahilyanagar District Bank Politics: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘कुकडी’च्या जप्तीने खळबळ; राहुल जगतापांची वाट बिकट?

शहरातील नामांकित विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पॅन्टचे हुक तुटले. या दोघांच्या वादात अन्य विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केला. खेळाच्या सुट्टीत दहा ते बारा टारगट विद्यार्थ्यांनी मैदानावर एकत्र येऊन एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. डोके बेंचवर आपटले, पाठीवर व कानामागे उळ उमटले आहेत. ही घटना शिक्षकांना सांगितल्यास दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावून पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. घरी आईने शाळेत काय झाले असे विचारल्यानंतर तुम्हाला आणि शिक्षकांना सांगितल्यानंतर ते पुन्हा मारतील, असे सांगत विद्यार्थ्याने भीती व्यक्त केली.

Ragging
Akole Ashram School: अकोल्यातील आश्रमशाळेची दुरवस्था; विद्यार्थी चटईवर, शुद्ध पाण्याचा अभाव, महिला अधीक्षिकाही नाही

हा प्रकार पालकांना समजल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांकडे रितसर अर्ज करून दाद मागितली. मुख्याध्यापकानी त्या दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना बोलावून घेत जुजबी कारवाई केली. परंतु, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये अशाच किरकोळ वादातून शाळेत गंभीर घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांकडून शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

Ragging
Shrigonda Lemon Price: श्रीगोंद्याच्या लिंबाला ‘पिवळे सोने’चे दिवस; घाऊक बाजारात १५० रुपये किलोचा भाव

पालकांनी विद्यार्थ्यांना विद्यालयात सोडल्यानंतर शाळेच्या सुट्टीच्या कालावधीत वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर शिक्षकांचे लक्ष देण्याची गरज आहे. वर्गातील विद्यार्थ्यांवर संघटित मारहाण, दमदाटी करणारे विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

शिरीष भांबरे, पालक, सारसनगर

वर्गातील काही विद्यार्थ्यांना रॅगिंग करण्यास रस असतो. अन्य विद्यार्थी भीती पोटी त्यांच्या गटात सामील होताता. किरकोळ कारणावरून एखाद्या विद्यार्थ्याला धुसफूस करून मारहाण केली जाते. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग करण्याची फॅशन बनली आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वच हालचालीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबद्दल पालक ही जबाबदार आहेत.

दीप्ती मैड, पालक, सिव्हिल हडको सावेडी

Ragging
Ahilyanagar Dengue Free: अहिल्यानगर ‘डेंगूमुक्त’ करण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये; घरोघरी पाणीसाठ्यांची तपासणी

शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यावर रॅगिंग सारखा प्रकार होत असल्यास ही गंभीर बाब आहे. मुध्यापकापकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे. आमच्याकडे तक्रारी असल्यास संबंधित विद्यालयात जावून विद्यार्थी व शिक्षकांचे समुपदेशन केले जाईल.

डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक, नगर शहर

शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या त्यागातूनच आदर्श व संस्कारमय विद्यार्थी घडत असतो. म्हणून पालकांनी आपला विद्यार्थी शाळेत काय करतो? शाळेच्या बाहेर आल्यानंतर आपला मुलगा कोठे जातो? त्याची संगत कशी आहे? वर्ग शिक्षकांनी घरी दिलेला अभ्यास करतोय का? वर्गात गैरवर्तुणूक करतोय का? या बाबीकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.

डी. एम. कासार, माजी मुख्याध्यापक, सावेडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news