Jamkhed Road Damage: जामखेडमध्ये रस्त्याचे नुकसान; फायबर कंपनीला ५५.६८ लाखांचा दंड, तरी खोदकाम सुरूच!

सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस; साईडपट्टी खोदल्याने अपघाताचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार, काम थांबवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी
Jamkhed Road Damage
Jamkhed Road DamagePudhari
Published on: 
Updated on: 

जामखेड: रस्त्याच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पी टू पी फायबर नेटवर्क कंपनीला ५५ लाख ६८ हजार ८८९ रुपयांचा दंड ठोठावून १५ दिवसांत रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, या कारवाईनंतरही रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागालगत साईडपट्टी खोदण्याचे काम सुरू असल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Jamkhed Road Damage
Godavari Water Protest: गोदावरीच्या बंधाऱ्यांसाठीचे आंदोलन स्थगित; विखे पाटलांचे चार दिवसांत तोडग्याचे आश्वासन

बांधकाम विभागाने पी टू पी कंपनीला जामखेड–करमाळा रस्ता, कुसडगाव–रत्नापूर–हळगाव–चोंडी रस्ता, तसेच राज्यमार्ग ते पाडळी फाटा या तीन रस्त्यांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याची परवानगी दिली होती. मात्र, रस्त्याचे नुकसान टाळणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग पूर्ववत करणे या अटींचे पालन न केल्याचे विभागाच्या निदर्शनास आले. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही खोदकाम सुरू राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Jamkhed Road Damage
Ahilyanagar District Bank Election: नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; मुंबईतील नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

उपअभियंता शशिकांत सुतार यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार, रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटरच्या आत डांबरी पृष्ठभागालगत खोदकाम झाल्याचे आढळले. यामुळे साईडपट्टी व डांबरी रस्त्याच्या कडांचे नुकसान झाले असून, वाहतुकीस अडथळा आणि अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद आहे.

Jamkhed Road Damage
Mohatadevi Temple: मोहटादेवी गडावर लाखो भाविकांची मांदियाळी; दर्शनासाठी अलोट गर्दी

साईडपट्टी खोदल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून वाहतूक करताना, विशेषतः ओव्हरटेक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनाला बाजू देण्यासाठी आवश्यक असलेली जागा कमी झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Jamkhed Road Damage
Hiware Bazar Water Shortage: हिवरे बाजारला ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट; काटकसरीने दुष्काळाचा सामना

रस्त्याची साईडपट्टी खोदून काढल्यामुळे वाहनचालकांना ओव्हरटेक करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अपघात होण्याची शक्यता असताना दंडाची नोटीस देऊनही खोदकाम सुरू असेल, तर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करत आहे? या रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने तातडीने काम थांबवून साईडपट्टी पूर्ववत करावी.”अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विभागाने कंपनीच्या परवानग्या रद्द करून नुकसानीच्या दुरुस्तीसाठी ५५ लाख ६८ हजार ८८९ रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. आता प्रत्यक्षात खोदकाम थांबवून रस्ता सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती ठोस कारवाई करणार, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news