Jamkhed Encroachment Case: जामखेड अतिक्रमण प्रकरणाची सुनावणी ५ मेपर्यंत पुढे

महामार्गावरील कारवाईला विलंब; प्रकल्प रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी
Jamkhed Encroachment Case
Jamkhed Encroachment CasePudhari
Published on
Updated on

जामखेड: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमणप्रकरणी उच्च न्यायालयातील अंतरिम स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jamkhed Encroachment Case
Rahuri University RTI Penalty: माहिती अधिकार प्रकरणात राहुरी कृषी विद्यापीठ अधिकाऱ्यावर २० हजारांचा दंड

जामखेड नगरपरिषदेने राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी 11 व 25 फेब्रुवारी रोजी संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांविरोधात काही अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, 2023मधील याचिकांच्या आधारे ‌‘संयुक्त मोजणी‌’ करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते, तसेच यासाठी आवश्यक शुल्कही भरलेले आहे. मात्र, अद्यापपर्यंत ही मोजणी करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले.

Jamkhed Encroachment Case
Gram Panchayat Administrator Powers: ग्रामपंचायत प्रशासकांच्या अधिकारांवर निर्बंध; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नगरपरिषदेच्या कारवाईस 24 मार्चपर्यंत अंतरिम स्थगिती दिली होती व त्याच दिवशी पुढील सुनावणी निश्चित केली होती. मात्र, त्या दिवशी सुनावणी न झाल्याने आता प्रकरणाची पुढील तारीख 5 मे 2026 ठरविण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तारखेलाही सुनावणी न झाल्यास पावसाळ्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणे कठीण होणार आहे.

Jamkhed Encroachment Case
Ahilyanagar Budget Meeting: नगर महापालिकेच्या बजेट सभेत गदारोळ; माळीवाडा वेशीवरून वाद

अतिक्रमण हटविण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे साडेतीन वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे शहरातील नवीन जलवाहिनी, तसेच भूमिगत गटार प्रकल्पही ठप्प झाले आहेत. दरम्यान, अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी आमरण उपोषण व साखळी उपोषण आंदोलन केले होते.

Jamkhed Encroachment Case
Ashok Kharat Shirdi Fraud: भोंदू अशोक खरातची शिर्डीत गुंतवणूक? उद्योजकांनाही कोट्यवधींचा गंडा

या आंदोलनाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तसेच खासदार निलेश लंके यांनी भेट देत सकारात्मक भूमिका दर्शविली होती. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या प्रकरणात आता सर्वांचे लक्ष 5 मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.

जामखेड नगरपरिषदेने राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्या विरोधात काही व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या संदर्भातील सुनावणी ही दि. 24 मार्च रोजी होणार होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही सुनावणी पुढे 5 मे रोजी होणार आहे.

अजय साळवे, मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news