Ahilyanagar Budget Meeting: नगर महापालिकेच्या बजेट सभेत गदारोळ; माळीवाडा वेशीवरून वाद

सखोल चर्चा न करताच बजेट मंजूर; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, ऐतिहासिक वेशीवरून खडाजंगी
Ahilyanagar Budget
Ahilyanagar BudgetPudhari
Published on
Updated on

नगर: महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत बजेटवर ठराविक नगरसेवक मुद्देसूद बोलले. नवोदीत नगरसेवक शांत बसल्याचे दिसून आले. विरोधी नगरसेवकांची आक्रमकता कुठेच दिसून आली नाही. कोणतीही सखोल चर्चा न होता गोंधळात महापौर ज्योती गाडे यांनी स्थायी समितीच्या शिफारसींना मंजुरी देत बजेट सभेची सांगता केली.

Ahilyanagar Budget
Ashok Kharat Shirdi Fraud: भोंदू अशोक खरातची शिर्डीत गुंतवणूक? उद्योजकांनाही कोट्यवधींचा गंडा

शुक्रवारी तहकूब केलेली अर्थसंकल्पीय सभा महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घेण्यात आली. बंद पडलेली रक्तपेढी, मागासवर्गीय कल्याण निधीची तरतूद आणि खर्च, ब्लू लाईनमध्ये अंतिम मंजुरी असलेल्या ले आऊटमध्ये बांधकाम परवानगी दिली जात नाही, बहुतांशी जण मालमत्ता खरेदी करतात मात्र, 1 टक्का शुल्क भरावे लागते म्हणून महापालिकेत नाव नोंदणी केली जात नाही, नगरसेवकांसाठी रोख स्वरुपात विकास निधीची तरतूद करा यासह अन्य विषयांवर नगरसेवकांनी चर्चा केली.

Ahilyanagar Budget
Ashok Kharat Cash Fraud: भोंदू अशोक खरातचा ‘कॅश ओनली’ घोटाळा उघड; लाखोंची फसवणूक समोर

नगरसेवक निखील वारे यांनी गॅस लाईनसाठी नव्याने केलेले रस्ते खोदाईस आक्षेप घेतला तसेच विना परवानगी फ्लेक्सने शहराचे विद्रुपीकरण होत असून फ्लेक्समुक्त शहरासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. दीपाली बारस्कर, पुष्पा बोरुडे, वर्षा सानप यांनी शहरात महिलांसाठी शौचालय उभारण्याची मागणी केली. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला. कुमारसिंह वाकळे, गणेश भोसले, संपत बारस्कर यांनी शहरातील पे ॲण्ड पार्कचा मुद्दा मांडत धोरणावरच आक्षेप घेतले. अवाजवी शुल्क वसुली व संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी अरेरावीचा मुद्दा मांडत वाकळे, बारस्कर, भोसले यांनी त्यास सुधारणा करण्याची मागणी केली.

Ahilyanagar Budget
Ashok Kharat Fraud: भोंदू अशोक खरातची फसवणूक; नेवासातील व्यावसायिकाची लाखोंची लूट

सत्ताधारी-विरोधक वेशीवरून आमने-सामने

माळीवाडा वेशीवरून महासभेत गदारोळ झाला. वेशीचे काहीच ऐतिहासिक महत्त्व नाही, ही वेस औरंगजेबाचे प्रतीक असून ती पाडावी, अन्यथा आम्ही ती पाडू, कोण आडवा येतो ते पाहू, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी घेत सभागृहात घोषणाबाजी केली. शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी वेस पाडण्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यावरून सत्ताधारी आणि शिंदेसेनेचे नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

Ahilyanagar Budget
Jeur Solar Project Protest: जेऊर सौर ऊर्जा प्रकल्पावरून वाद; आदिवासी समाजाचा आंदोलनाचा इशारा

शिवसेनेचे कवडे सत्तेच्या बाजूने

माळीवाडा वेस पाडण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे मात्र सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादीच्या बाजुला झुकल्याचे दिसले. फुले दाम्पत्याच्या स्मारकाचे आमदार संग्राम जगताप यांना श्रेय मिळू नये, म्हणून वेस पाडण्याला विरोध केला जात आहे. मी मात्र, आपल्या सोबत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

स्मारकाला विरोध नाही, ऐतिहासिक वास्तूचे जतन करा

माळीवाडा वेशीचा मुद्दा चर्चेला आला त्यावेळी शिवसेनेच्या सुरेखा कदम व दत्तात्रय कावरे दोघेचे सभागृहात उपस्थित होते. माळीवाडा येथे फुले दाम्पत्याचे भव्य स्मारक व्हावे, अशी आमची भूमिका आहे. यासाठी आम्हीही प्रयत्न केले आहेत मात्र, माळीवाडा वेस ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिचे संवर्धन करावे, असा मुद्दा सुरेखा कदम यांनी मांडला. दत्तात्रय कावरे म्हणाले, ‌‘या वेशीला ऐतिहासिक महत्त्व आहे. म्हणून ती पाडू नये‌’. महापौर, आयुक्त यांनी कुठलाही निर्णय न देता वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news