Hanmantgaon Leopard Terror: हणमंतगावात बिबट्याची दहशत कायम; चिमुकल्यावर झेप घेण्याचा प्रयत्न, बहिणीच्या प्रसंगावधानाने जीव वाचला

सलग तीन घटनांनी ग्रामस्थ धास्तावले; वनविभागाकडून तीन पिंजरे, थर्मल ड्रोन आणि वाढीव गस्त
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

सोनगाव: हणमंतगाव (ता. राहाता) परिसरात बिबट्याची दहशत सुरूच आहे. सलग तीन घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी एका चिमुकल्याच्या दिशेने बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या बहिणीच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला. या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तीन पिंजरे, थर्मल ड्रोन आणि वाढीव गस्तीचा आधार घेतला आहे.

Leopard Attack
Ahilyanagar Rain Deficit: नगर जिल्ह्यात पावसाची पाठ; तीन महिन्यांत ८४ टक्केच पाऊस, ९७ टँकरने पाणीपुरवठा

हणमंतगावातील मोहटा देवी, फिरस्ती आई मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, नदीकाठ तसेच घोलप वस्ती परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर आढळून येत आहे. ऊस, दाट झाडी आणि उंच पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण मिळत असल्याने त्याचा वावर वाढला आहे.

Leopard Attack
Rahuri Shani Shinganapur Railway: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

बिबट्याने कोंबड्यांवरही हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी नदीकाठच्या शेतात कपाशीवर औषध फवारणी करणारे मच्छिंद्र भाऊसाहेब जेजुरकर यांच्यावर उसातून अचानक बाहेर पडलेल्या बिबट्याने झडप घातली. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्या पसार झाला. त्यानंतर विलास जेजुरकर यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.

Leopard Attack
Kukadi Sugar Factory: कुकडी कारखान्यावर ३७० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीची नोटीस; जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर खळबळ

रविवारी दुपारी अजिंक्य घोलप यांच्या वस्तीवर बिबट्याने कोंबडीवर झडप घातली. त्याचवेळी जवळ खेळत असलेल्या अद्विककडे त्याची नजर गेली. धोका ओळखताच साक्षीने धावत जाऊन अद्विकला उचलून गोठ्यात नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Leopard Attack
Nevasa Encroachment Dispute: नेवासा शहरात तणाव; अतिक्रमणाच्या वादातून वाहनाची तोडफोड, पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली

वरील घटनांची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाने परिसरात तीन पिंजरे लावले आहेत. नदीकाठचा पिंजरा हलवून घोलप वस्तीवर बसविला आहे. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर सुरू असून वनपथकाची गस्तही वाढविली आहे. वनरक्षक प्रतीक गजेवार, मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांच्यासह पथकाकडून पाहणी सुरू आहे.

शेतीची कामे ठप्प...

दरम्यान, बिबट्याच्या दहशतीमुळे मजूर शेतात येण्यास धजावत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती आहे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली असून बिबट्याला तातडीने जेरबंद करून परिसराला दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news