

बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील घोटण गावातील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे व 52 इंची एलईडी टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि3 ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष संजय टाकळकर यांच्या संकल्पनेतून, कै. दादासाहेब टाकळकर यांच्या स्मरणार्थ तसेच केशरबाई शामराव गंगावणे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटण येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलिस उपाधीक्षक नीरज राजगुरू अध्यक्षस्थानी होते. त्यांनी, प्रत्येक गावात असे उपक्रम राबविले जावेत, असे मत व्यक्त करून वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल टाकळकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनीही असे उपक्रम प्रत्येक गावात राबविले जावेत. चांगल्या विचारांतूनच अशा उपयुक्त संकल्पना साकार होतात. गावांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त केले.
भाजप तालुकाध्यक्ष संजय टाकळकर म्हणाले, कै. दादासाहेब टाकळकर प्रतिष्ठानच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मल्लिकार्जुन ईश्वर मंदिरासमोर स्टेट लाईट उभारण्यात आले आहेत. त्याचा संपूर्ण खर्च प्रतिष्ठानने केला आहे. तसेच पुढील देखभाल खर्चही प्रतिष्ठान कायमस्वरूपी करणार आहे.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव टाकळकर, केदारेश्वर चे संचालक रणजित घुगे, सरपंच पुष्पा जगन्नाथ पवार, उपसरपंच ज्ञानेश्वर कुलट, खरेदी-विक्री संघाचे भारत मोटकर, विकास सोसायटीचे चेअरमन कारभारी थोरात, माजी सरपंच पीर मोहम्मद शेख, कुंडलिक घुगे, विष्णू घुगे, तुकाराम थोरवे, बाळासाहेब साळवे, सुधीर पवार, संजय क्षीरसागर, नितीन घाडगे, सुरज घाडगे, किशोर गंगावणे, भाऊसाहेब शिरसागर, रामजी क्षीरसागर, महादेव मोटकर उपस्थित होत्या.