Cotton Price In Maharashtra: कापसाला ९ हजारांचा भाव; तरीही शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत!

उत्पादनात मोठी घट, शेतीखर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले; घोडेगावात कापूस खरेदीला वेग
Cotton Price In Maharashtra
Cotton Price In MaharashtraPudhari
Published on: 
Updated on: 

घोडेगाव: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सध्या कापूस खरेदीला वेग आला असून, कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. दिवाळी जवळ आल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. बाजारात कापूस विक्रीची लगबग वाढली असली, तरी अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचेच सावट दिसत आहे.

Cotton Price In Maharashtra
Ahilyanagar Chess Tournament: अहिल्यानगरमध्ये चीनचा बुद्धिबळ खेळणारा रोबोट; खेळाडूंशी थेट भिडणार!

यंदा पावसाच्या अनियमिततेसह विविध कारणांमुळे कापूस उत्पादनात घट झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणीपासून मशागत, खते, औषधे, मजुरी आणि पाण्यापर्यंत केलेला खर्च मोठा; मात्र पदरात पडणारे उत्पादन कमी, अशी परिस्थिती अनेक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. वर्षभर शेतात राबून, ऊन-पावसाची तमा न बाळगता घाम गाळल्यानंतरही अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

Cotton Price In Maharashtra
Chas Ghat Robbery Case: चास घाटात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांचा छापा; चौघे जेरबंद

दिवाळी म्हटले की घराघरांत आनंद, उत्साह, नवीन कपडे, फराळ, रोषणाई आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हसू डोळ्यांसमोर येते. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात यंदा दिवाळीच्या आनंदासोबत आर्थिक विवंचनेचीही चाहूल लागली आहे. मुलांना नवीन कपडे घ्यायचे आहेत, घरासाठी किराणा भरायचा आहे, फराळाची तयारी करायची आहे; तसेच शेतीसाठी घेतलेली उधारी आणि इतर देणीही भागवायची आहेत. या सगळ्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी हाती आलेला कापूस विक्रीस काढत आहेत.

काही शेतकऱ्यांसाठी कापूस विक्रीतून मिळणारी रक्कम ही दिवाळीचा सण साजरा करण्याची एकमेव आशा ठरत आहे. वर्षभर कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या बळीराजाला आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे; मात्र त्यासाठी किती खर्च करावा आणि कोणत्या गरजेला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाचा आनंद जपणाऱ्या शेतकऱ्याची ही धडपड मन हेलावून टाकणारी आहे.

Cotton Price In Maharashtra
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदेंची पीछेहट; दोन मोहरे मैदानाबाहेर!

एकीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, मेहनत घेऊन आणि मोठ्या अपेक्षेने उभे केलेले पीक कमी प्रमाणात हाती आल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ कापसाला मिळणारा भाव पुरेसा दिलासा देऊ शकत नाही; उत्पादनातील घट आणि वाढता शेतीखर्च यांचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन नुकसान आणि उत्पादनातील घट यांचे योग्य मूल्यमापन करावे. पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून ती वेळेत मिळेल, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकरी सुखी असेल, तरच गावाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. शेतकऱ्यांच्या कष्टातूनच बाजारपेठा गजबजतात आणि सणासुदीच्या काळात अर्थचक्राला गती मिळते. मात्र, त्याच बळीराजाच्या घरात आर्थिक अडचणींमुळे दिवाळीचा आनंद फिका पडत असेल, तर ही परिस्थिती चिंतन करायला लावणारी आहे.

Cotton Price In Maharashtra
Highway Land Acquisition Compensation: महामार्गासाठी भूसंपादनाचा मोबदला नाकारला; शेतकऱ्यांचा एल्गार!

दिवाळीच्या या प्रकाशपर्वात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अंधार दूर व्हावा, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे हास्य फुलावे, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. बळीराजाच्या घामाला न्याय आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला, तरच त्याची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होईल.

खरेदी केलेला कापूस गुजरात राज्यात पाठविला जातो. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचे उत्पन्न फार कमी आहे. शेतकऱ्यांचा कापूस ९ हजार रुपयापर्यंत खरेदी केला जात आहे.

अनुज सर्जेराव सोनवणे, कापूस खरेदीदार, घोडेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.