Chas Ghat Robbery Case: चास घाटात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांचा छापा; चौघे जेरबंद

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपींचाही समावेश; सहा जणांची नावे निष्पन्न, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Chas Ghat Robbery Case
Chas Ghat Robbery CasePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: नगर-पुणे महामार्गावर चास घाटा परिसरात वाहनांना अडवून मारहाण करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपींसह एकूण ४ जणांना जेरबंद करण्यात आले असून, अन्य सहा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

Chas Ghat Robbery Case
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदेंची पीछेहट; दोन मोहरे मैदानाबाहेर!

सुशांत सुरेश भोसले (वय २३), अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (वय २३, दोघे रा. पिंपळगाव कवडा, ता. अहिल्यानगर), वैभव किरण भोसले (वय २६, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), राम उर्फ बोकड्या उर्फ बठ्या लखन काळे (वय १९, रा. कामरगाव, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

Chas Ghat Robbery Case
Highway Land Acquisition Compensation: महामार्गासाठी भूसंपादनाचा मोबदला नाकारला; शेतकऱ्यांचा एल्गार!

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार करून गस्तीसाठी रवाना केले होते. २९ ऑक्टोबर रोजी हे पथक नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, नगर-पुणे महामार्गावर चास गावच्या शिवारात काही व्यक्ती हातात धारदार हत्यारे घेऊन वाहनांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

Chas Ghat Robbery Case
Sangamner MSEDCL Lineman Attack: वीज तोडल्याने वायरमनला मारहाण करून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न; संगमनेरात गुन्हा दाखल, दोघांना अटक

त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावून ४ आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. चौकशीदरम्यान जाक्या संजय काळे, आवेश मिरफा भोसले, जयपाल संजय काळे, प्रथमेश मिरफा भोसले, परमेश मिरफा भोसले आणि तुषार सावत्या भोसले हे ६ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दुचाकी, चाकू, गलोल असा ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Chas Ghat Robbery Case
Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या शिक्षण विभागात खळबळ! शिक्षकांच्या जुन्या मान्यतांची होणार तपासणी

लुटीच्या गुन्ह्याची उकल

तपासामध्ये आरोपींनी चास-कामरगाव घाट परिसरात महामार्गावर ५ ते ६ वाहनांना अडवून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा पोलिस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात हे आरोपी फरार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.