Gas Price Rise Tea Price Increase: गॅस महागला; नगरमध्ये चहा 2 तर वडापाव 5 रुपयांनी महाग

युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढीचा परिणाम; चहा, कॉफी, मॅगीसह स्ट्रीट फूडचे दर वाढले
Vada Pav
Vada PavPudhari
Published on
Updated on

नगर: इराण विरोधात इस्त्राईल, अमेरीकेत सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता सर्वसामान्यांच्या खिशालाही बसू लागले आहेत. घरगुतीसोबतच व्यवसायिक गॅसही महाग झाल्याने आता चहाचा घोटही दोन रुपयांनी ‌‘गरम‌’ झाला आहे. तर वडापावसाठीही आता पाच रुपयांची ‌‘झळ‌’ सोसावी लागत आहे.

Vada Pav
Moneylender Assault Worker: व्याजाच्या पैशांसाठी कामगाराला मारहाण; घरात डांबून ठेवल्याची घटना

जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने युद्धाचा धूर अगदी स्वयंपाक घरापर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर व्यवसायिक गॅस टाकी मिळवण्यासाठीही दुकानदारांची धावपळ सुरू झाली आहे.

Vada Pav
Shrirampur Loan Collection Fraud: कर्ज वसुलीतील 3.51 लाखांचा अपहार; श्रीरामपूरमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यावर गुन्हा

मोठ्या प्रयत्नानंतर 1750 ते 3000 रुपयांपर्यंत गॅस टाकी मिळत असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. काल बुधवारी चहाच्या सेंटरवर गेल्यावर गॅस महागल्याने आता चहा दोन रुपयांनी वाढवल्याचे दुकानदाराने सांगितले. त्याचबरोबर चस्का चहा पूर्वी दहा रुपयांना होता तो आता 12 रुपये झाला आहे.

Vada Pav
Kondhwa Murder Conspiracy Accused Arrest: कोंढवा खुनाच्या कटातील आरोपी अहिल्यानगरमध्ये जेरबंद

कॉफी 25 रुपयांना होती, ती 28 रुपयांना मिळणार आहे. दूध ग्लास 20 रुपयांना होता, तो आता 25 रुपये केला आहे. तसेच मॅगी प्लेट 30 रुपयांना होती ती आता 40 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील नामांकीत वडापाव पुर्वी 20 रुपयांना मिळत होता.

Vada Pav
Domestic Gas Cylinder Misuse Raid: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड; राहुरी-नगरमध्ये छापे

कालपासून त्यासाठी 25 रुपये मोजावे लागत आहेत. एकूणच, युद्ध हजारो किलोमिटर दूर सुरू असले तरी त्याच्या झळा इकडे सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळेच चहासोबत वडापावची चव महागल्याचे दिसते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news