Gas Cylinder Misuse Raid
Gas Cylinder Misuse RaidPudhari

Domestic Gas Cylinder Misuse Raid: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड; राहुरी-नगरमध्ये छापे

हॉटेल्स व दुकाने तपासून प्रशासनाची कारवाई; घरगुती गॅस सिलिंडर जप्त, हॉटेल चालकांमध्ये खळबळ
Published on

राहुरी: हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास गैरवापर होत असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हा पुरवठा विभागाने अचानक तपासणी मोहीम राबविली. 35 हॉटेल्सची तपासणी करत तेथून 11 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघडकीस आले.

Gas Cylinder Misuse Raid
Shirdi Prasadalaya Menu Change: गॅस टंचाईचा परिणाम: शिर्डी प्रसादालयात दाळ-भात बंद

जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने राहुरी तालुक्यात संयुक्त कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे हॉटेल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरून स्वयंपाक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. नियमांनुसार हॉटेल, ढाबे व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याचे उघड झाले.

Gas Cylinder Misuse Raid
Kopargaon Property Tax Relief: कोपरगाव अभय योजना: मालमत्ता कर शास्तीवर ५०% माफी

शहरातील एमआयडीसी परिसरात अन्नधान्य वितरण विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा उघडकीस आला असून 9 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.

Gas Cylinder Misuse Raid
Ahilyanagar Development Fund: नगर-केडगाव रस्ते आणि पूल विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांद्वारे विविध ठिकाणी नियमित तपासण्या सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत 59 हॉटेल्स व 6 गॅस वितरक संस्थांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण 11 सिलिंडर जप्त करण्यात आले असून धाडीत ते ताब्यात घेण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर अनधिकृतरीत्या साठवून ठेवणे नियमबाह्य असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते.

Gas Cylinder Misuse Raid
Ahilyanagar MIDC Gas Shortage: गॅस टंचाईमुळे एमआयडीसीतील उद्योग अडचणीत; पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

ही कारवाई नगर शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, नगर तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, राहुरीचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार, बीपीसीएल कंपनीचे जिल्हा समन्वय अधिकारी राजकुमार मिश्रा, नगर शहराचे पुरवठा निरीक्षक तेजस पाटील, महसूल सहाय्यक अक्षय एकशिंगे व वाहनचालक योगेश शहाणे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news