Ganesh Idol Price 2026: गणेशमुर्ती २५% महाग; कच्चा माल व वाहतूक खर्च वाढल्याने भावात मोठी वाढ

प्लास्टर, रंग, सजावट साहित्य आणि डिझेल दरवाढीचा फटका; यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पा महागणार
Ganesh Idol
Ganesh IdolPudhari
Published on
Updated on

नगर: यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमुर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांना देखील महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती, वाहतूक खर्चातील वाढ आणि कुशल कारागिरांची वाढती मजुरी , यामुळे यावर्षी ‘बाप्पा’ साधारणतः 25 टक्के महागला असल्याचे सांगितले जाते आहे.

Ganesh Idol
Ghaywal Gang Accused Arrested: घायवळ टोळीशी संबंधित दोन फरार आरोपी जेरबंद; मोक्का गुन्ह्यांतील आरोपींना एलसीबीची अटक

यावर्षी सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर वांबोरी-नगर रोडवरील मुर्ती कारखान्यांमधील गणेशमुर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. वांबोरी येथील पांडुरंग गवते यांच्या गणेशमूर्ती कारखान्यामध्ये मुर्तीकारागीर हे रंगकामात व्यस्त असल्याचे दिसते आहे.

Ganesh Idol
Akole Leopard Attack: बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका; पित्याची जीवाची बाजी, बाप-लेक विहिरीत कोसळले

साधरणतः 10 ते 12 कुशल कारागीर यांच्या माध्यमातून गणेश मुर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरीस, शाडू, माती रंग, सजावटीचे साहित्य आणि इतर आवश्यक साम्रुगीची किंमती वाढल्या आहेत. याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चावरही त्याचे परिणाम पहायला मिळत आहे.

Ganesh Idol
Ahilyanagar Prostitution Racket: पारनेरमध्ये दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती मूर्तीपासून मोठ्या सार्वजनिक मूर्तीपर्यंत सर्वच प्रकारच्या मुर्तींचे दर वाढलेले आहेत. हे दर वाढतेच असल्याने बुकींगही सुरू झाले आहे. गणेशोत्सवाला अजुन काही आठवडे बाकी असताना गणेशमूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Ganesh Idol
Sodha Pattern Politics: जिल्हा बँक निवडणुकीत ‘सोधा’ पॅटर्नचा दबदबा?; नातेसंबंधांच्या राजकारणाची पुन्हा चर्चा

मूर्तीकार गवते सांगतात..

वांबोरीतून जिल्ह्यासह सुरत, हैद्राबाद आणि गुजरात इत्यादी ठिकाणी मुर्ती पाठवल्या जातात. यावर्षी किमती वाढल्या आहेत. मुर्तीसाठी रंगाचे केमीकल बाहेरच्या देशातून येते. सोनेरी रंग आखाती देशातून आणला जातो. एनएसपी पूर्ल अर्थात मुर्तीचा मुकूट, दागिणे, वस्त्रसजावट, सिंहासन व इतर सजावटीच्या भागामध्ये मोत्यासारखी चमक आणण्यासाठी आवश्यक साहित्य हे उत्तर कोरीयातून येते. युद्धजन्य परिस्थिती, वाढलेले डिझेलचे दर आणि त्याचा वाहतूक खर्चावर झालेला परिणाम इत्यादी कारणांमुळे सर्व साहित्याचे दर देखील15 टक्के वाढलेले आहेत. यावर्षीच्या नव्या दरानुसार, दहा फुट 51000, एक फुटाचे मूर्ती 700 तर दीड फुट 2100 या दरम्यान हे दर असू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news