Ghaywal Gang Accused Arrested: घायवळ टोळीशी संबंधित दोन फरार आरोपी जेरबंद; मोक्का गुन्ह्यांतील आरोपींना एलसीबीची अटक

खंडणी आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणांतील फरार आरोपी कोल्हापूर व अहिल्यानगरमधून ताब्यात; पुण्यातील गंभीर गुन्ह्यांशी संबंध उघड
Ghaywal Gang Accused Arrested
Ghaywal Gang Accused ArrestedPudhari
Published on
Updated on

जामखेड: पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड) याला कोल्हापूर जिल्ह्यातून, तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

Ghaywal Gang Accused Arrested
Akole Leopard Attack: बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका; पित्याची जीवाची बाजी, बाप-लेक विहिरीत कोसळले

खर्डा येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रोहित गोलेकर याने व्हॉट्सॲप कॉलद्वारे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. "पुण्यातील संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात तू मला वाचवले नाहीस. त्यामुळे माझे नुकसान झाले," असे सांगत खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ghaywal Gang Accused Arrested
Ahilyanagar Prostitution Racket: पारनेरमध्ये दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे पथक आरोपींचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रोहित गोलेकर हा कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव फाटा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २१ जून रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ghaywal Gang Accused Arrested
Sodha Pattern Politics: जिल्हा बँक निवडणुकीत ‘सोधा’ पॅटर्नचा दबदबा?; नातेसंबंधांच्या राजकारणाची पुन्हा चर्चा

तपासादरम्यान रोहित गोलेकर हा पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत दाखल मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्येही फरार असल्याचे उघड झाले. दरम्यान, कोथरूड पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे हा मिरजगाव परिसरातील सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्धही मोक्का आणि शस्त्र कायद्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

Ghaywal Gang Accused Arrested
Ration Grain Black Market: राहुरीत १३ टन रेशनिंगचा गहू-तांदूळ जप्त; काळाबाजाराचा पर्दाफाश

पोलीस नोंदीनुसार रोहित गोलेकर याच्याविरुद्ध सात, तर ज्ञानेश्वर तोंडे याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. दोघेही पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेला रोहित गोलेकर याला पुढील तपासासाठी खर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ज्ञानेश्वर तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news