Ahilyanagar Prostitution Racket: पारनेरमध्ये दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

पिटा कायद्यांतर्गत कारवाई; वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल, चौघे ताब्यात
Ahilyanagar Prostitution Racket
Ahilyanagar Prostitution RacketPudhari
Published on
Updated on

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोन हॉटेलवर छापा घालून पिटा कायद्यांतर्गत कारवाई करीत पाच महिलांची सुटका केली. तर, दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Prostitution Racket
Sodha Pattern Politics: जिल्हा बँक निवडणुकीत ‘सोधा’ पॅटर्नचा दबदबा?; नातेसंबंधांच्या राजकारणाची पुन्हा चर्चा

सुनील लक्ष्मण खोले (वय 39, रा. नारायणगव्हाण ता. पारनेर), विनोंद विलास मिडाळेकर (वय 29, रा. शास्त्रीनगर, ता. जि. बेळगाव, हल्ली रा. ओम साई हॉटेल, पळवे ता. पारनेर) अशी त्या दोघांची नावे आहेत. दीपक सुनार सन ऑफ रामबहादुर सुनार (रा. नेपाळ), गोवर्धन ओमप्रकाश बुल (रा. नेपाळ, हल्ली रा. राखी पँलेस लाँजिग पळवे, ता. पारनेर) असे त्या दोघांची नावे आहेत.

Ahilyanagar Prostitution Racket
Ration Grain Black Market: राहुरीत १३ टन रेशनिंगचा गहू-तांदूळ जप्त; काळाबाजाराचा पर्दाफाश

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुम्मका सुदर्शन यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुटकुळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, महिला पोलिस अंमलदार चिमा काळे यांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केले.

त्यानुसार 19 जून रोजी सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, हॉटेल ओम साई व राखी पॅलेस लॉजिंग पळवे शिवार (ता. पारनेर) येथे हॉटेल मालक हे महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहेत. त्यानुसार पोलिस पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक गडकरी यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हॉटेल ओमसाईवर बनावट ग्राहक पाठवून छापा घातले.

Ahilyanagar Prostitution Racket
Maharashtra Farmers Loan Waiver: खतांचे दर वाढले, उत्पन्न घटले; शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी

हॉटेलवर छापा टाकून हॉटेलमधील सुनील खोले, विनोद मिडाळेकर यांना ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाईल असा 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलची पाहणी करता हॉटेलचे रूममध्ये दोन महिला मिळून आल्या. तसेच, ताब्यातील व्यक्ती व महिला यांना वेश्या व्यवसायाचे काम कोणासाठी करता विचारले असता संग्राम कांडेकर (रा. नारायणगव्हाण ता. पारनेर(फरार) यांच्यासाठी करीत असल्याचे सांगितले आहे.

Ahilyanagar Prostitution Racket
Mula Dam Illegal Mining: मुळा धरणातील अवैध उत्खनन प्रकरण गूढात; रॉयल्टी पावत्यांमुळे संशय वाढला

त्यानंतर पथकाने राखी पॅलेस लॉजिय येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर बनावट ग्राहक पाठवून छापा घातला. हॉटेलमधून दीपक सुनार, गोवर्धन बुल यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलचे रूममध्ये तीन महिला मिळून आल्या.त्यांनी वैभव साठे (रा. चास, ता.जि. अहिल्यानगर (फरार) यांच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले. आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगून, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधून आम्हास पैस देतात आणि आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात, अशी माहिती दिली. याप्रकरणी पोलिस अंमलदार अतुल लोटके यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news