Akole Leopard Attack: बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका; पित्याची जीवाची बाजी, बाप-लेक विहिरीत कोसळले

अकोले तालुक्यातील डोंगरगावातील थरारक घटना; चार वर्षीय अवनी गंभीर जखमी, वडिलांवरही उपचार सुरू
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

गणोरे: पोटच्या चिमुरडीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी बापाने स्वतःच्या प्राणाची बाजी लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अवनी मनोज गुंजाळ, असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चारवर्षीय मुलीचे नाव आहे. तर तिचे वडील मनोज गुंजाळ हे विहिरीत पडून जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leopard Attack
Ahilyanagar Prostitution Racket: पारनेरमध्ये दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी (दि.२०) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आपल्या चार वर्षांच्या मुलीला बिबट्या ओढून नेताना पाहून पित्याने बिबट्याशी थेट दोन हात केले आणि मुलीची सुटका केली. मात्र, बिबट्याच्या तावडीतून सुटून धावताना अंधारात बाप-लेक दोघेही एका खोल विहिरीत कोसळले. या भीषण थरारात दोघेही गंभीर जखमी झाले.

Leopard Attack
Sodha Pattern Politics: जिल्हा बँक निवडणुकीत ‘सोधा’ पॅटर्नचा दबदबा?; नातेसंबंधांच्या राजकारणाची पुन्हा चर्चा

डोंगरगाव येथील रहिवासी मनोज गुंजाळ यांची चार वर्षांची मुलगी अवनी ही तिच्या आईच्या पाठीवर होती. याचवेळी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अवनीवर झडप घातली. बिबट्याने अवनीला तोंडात पकडले आणि तो तिला अंधाराच्या दिशेने काही अंतरापर्यंत ओढत नेऊ लागला. अवनीच्या आईने आरडाओरडा करताच जवळच असलेले तिचे वडील जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने पळत सुटले.

Leopard Attack
Ration Grain Black Market: राहुरीत १३ टन रेशनिंगचा गहू-तांदूळ जप्त; काळाबाजाराचा पर्दाफाश

बिबट्याच्या तावडीतून अवनीला सोडवल्यानंतर, मनोज हे तिला कडेवर घेऊन जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने पळत सुटले. परंतु, रात्रीची वेळ आणि दाट अंधार असल्यामुळे त्यांना समोर असलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही. पळण्याच्या वेगात मनोज गुंजाळ हे मुलीसह थेट खोल विहिरीत कोसळले. दोघे विहिरीत पडल्याचा आवाज आणि कुटुंबाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळाकडे धावले.

Leopard Attack
Maharashtra Farmers Loan Waiver: खतांचे दर वाढले, उत्पन्न घटले; शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी

ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने विहिरीतून वडील आणि मुलीला बाहेर काढले. बिबट्याच्या हल्ल्यात अवनी गंभीर जखमी झाली असून विहिरीत पडल्यामुळे मनोज गुंजाळ यांनाही मोठी दुखापत झाली आहे. दोघांनाही तातडीने संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जिवाची पर्वा न करता बिबट्यावर हल्ला

गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्या डोळ्यांदेखत पोटच्या मुलीला बिबट्या ओढून नेतोय हे पाहून त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्या बिबट्यावर थेट हल्ला चढवला. त्यांनी मोठ्या धैर्याने बिबट्याशी मुकाबला करत त्याच्या तावडीतून चिमुरड्या अवनीला सोडवून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news