Dhangarwadi Highway Repair: अखेर धनगरवाडीमध्ये महामार्ग दुरुस्तीला सुरुवात; खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा

सलग रेंगाळलेल्या कामांवर नाराजी; सहा महिन्यांच्या समस्येनंतर सुरू झाले खड्डे बुजविण्याचे काम
Dhangarwadi Highway Repair
Dhangarwadi Highway RepairPudhari
Published on
Updated on

नगर तालुका : छत्रपती संभाजीनगर महामार्गाची नगर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Dhangarwadi Highway Repair
Rahuri Pattern: नगरचा ‘राहुरी पॅटर्न’ राज्यात चर्चेत; शैक्षणिक धोरण ठरतंय मार्गदर्शक

महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनचालक व मालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. महामार्गाची दुरुस्ती सलगपणे न करता धनगरवाडी शिवारात दुरुस्तीचे काम रेंगाळले होते. या परिसरात वाहन चालवणे अवघड झाले होते. धनगरवाडी शिवारातील एक किलोमीटर लांबीच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

Dhangarwadi Highway Repair
Unauthorized Hoardings Karjat: कर्जत शहरात पोलिस बंदोबस्तात अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची धडक कारवाई

गुरुवार ( दि.11) रोजी धनगरवाडी शिवारात महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.

Dhangarwadi Highway Repair
Sambhajinagar Highway Potholes: छ. संभाजीनगर महामार्गाची दुरवस्था; धनगरवाडी परिसरात खड्ड्यांमुळे अर्धा तास प्रवास

गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दयनीय अवस्था झाली होती. त्यातच मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याची खूपच दुरवस्था झाली. खड्डे बुजविताना सलगपणे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. काही पट्टे सोडून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. धनगरवाडी शिवारात महामार्गावरून दुचाकी चालवणे अवघड झाले होते. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे धनगरवाडी शिवारातील महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती.

Dhangarwadi Highway Repair
Pune Nashik Railway Protest: पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी बोटा येथे १२ जानेवारीला जनआंदोलन

गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असले तरी इतर ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तसेच संपूर्ण महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news