Cummins Company Workers Protest: कमिन्स कंपनीतील ६५ कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; कुटुंबीयांसह उपोषण सुरू

१० ते १२ वर्षे काम करूनही अचानक कामावरून कमी केल्याचा आरोप; पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
Cummins Company Workers Protest
Cummins Company Workers ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील कमिन्स कंपनीतील ६५ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या या कामगारांनी पुन्हा कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि. २)पासून कुटुंबीयांसह कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे.

Cummins Company Workers Protest
Hydroponic Green Fodder: दुष्काळात जनावरांच्या चारा टंचाईवर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा उतारा!

संबंधित कंपनीचा ठेका नव्याने एमआरसी कंपनीने घेतल्यानंतर जुन्या कामगारांना तीन महिने कामावर ठेवण्यात आले. त्यानंतर अचानक उद्यापासून कामावर येऊ नका, असे तोंडी सांगण्यात आले. कोणतीही लेखी नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच त्यांच्या जागी नवीन कामगारांना रुजू करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Cummins Company Workers Protest
Ahilyanagar District Bank Chairman Election: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेणार; सुजय विखेंनी कायम ठेवला सस्पेन्स!

या प्रकरणी कामगारांनी येथील कामगार आयुक्त कार्यालयात लेखी निवेदन दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुनावणीच्या तारखा मिळत आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापन व एमआरसी कंपनीच्या प्रतिनिधींना कामगारांना पुन्हा रुजू करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Cummins Company Workers Protest
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रस्थापितांचाच वरचष्मा! लहामटेंना धक्का; काळे, शिंदे, गडाख गटाची बाजी

६५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत कामगारांना पुन्हा कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा ठाम पवित्रा कामगारांनी घेतला आहे. या आंदोलनाकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे.