Bhagar Adulteration Alert: नवरात्रीत भगर खरेदी करताना सावधान! अहिल्यानगरमध्ये ७० रुपये किलोने कोद्राची विक्री

भगरीसारखा दिसणारा कोद्रा बाजारात दाखल; भेसळीची शक्यता, अन्न व औषध प्रशासनाकडून पॅकबंद भगर खरेदी करण्याचे आवाहन
Kodra
KodraPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगरीसारखा दिसणारा कोद्रा अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. भगरीचा भाव किलोला अडीचशे रुपये असताना, कोद्रा अवघ्या ७० रुपये किलोने दारोदार विकला जात आहे. भगरीमध्ये कोद्राची भेसळ केली की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

Kodra
Mohtadevi Navratri Festival: मोहटादेवी गडासह अहिल्यानगर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने काळजीपूर्वकच भगर खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रीच्या उपवासाला भगरीचे पदार्थ खाल्ले जातात. यंदा कोद्रा हा भगरीसारखा प्रकार बाजारात दाखल झाला आहे. भरडधान्य गणला जाणारा कोद्रा विक्रीवर बंदी नाही, मात्र भगरीपेक्षा स्वस्ताईने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Kodra
Nevasa Theft News: नेवासा परिसरात चोरट्यांची दहशत; वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांचा जागता पहारा

भगरीत कोद्राची भेसळ

काही महाभाग दरोदार फिरून भगरीमध्ये कोद्रा मिक्स करून त्याची करत आहेत. भगर आणि कोद्रा दोन्हीत साम्य असल्याने गाव खेड्यातील महिलांची फसवणूक सुरू असल्याचे चित्र आहे. भगर समजून या महिला कोद्रा खरेदी करत आहेत. जुनाट कोद्रा खाण्यात गेला तर विषबाधा होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

Kodra
Khed Land Map Errors: सातबारा आपला, पण ऑनलाइन नकाशावर गट दुसऱ्याच शेतात!

जिल्ह्यात विषबाधेच्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून या संशयकल्लोळामुळे भगर आणि भगरीच्या पिठाचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. महिलांनी उघड्यावरील भगर आणि भगरीसारखाच दिसणारा कोद्रा किंवा सुटे भगरीचे पीठ खरेदी करणे पूर्णपणे टाळावे. पॅक केलेली भगरच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Kodra
Mula River Dams: दुष्काळात मुळा नदीवरील आठ बंधारे भरले; शेतकऱ्यांना दिलासा

कोद्रा ७० तर भगरीचा भाव दोनशे रुपये किलो आहे. भगरीमध्ये कोद्रा मिक्स करून विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुनाट कोद्रा खाण्यात गेला, तर विषबाधा होण्याची भीती असते. त्यामुळे नवरात्रीत पॅकबंद भगरच घ्यावी. आम्ही नमुने तपासणी करत आहोत. नागरीकांनीही आवश्यक काळजी घ्यावी.

गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news