Mula River Dams: दुष्काळात मुळा नदीवरील आठ बंधारे भरले; शेतकऱ्यांना दिलासा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर नदीपात्रात पाणी; पशुधनासह शेतीला होणार फायदा, काटकसरीने वापराचे आवाहन
Mula Dam
Mula DamPudhari
Published on: 
Updated on: 

वळण: दुष्काळी परिस्थिती असताना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे व काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना देखील शेतकरी व आ. प्राजक्त तनपुरे, आ. अक्षय कर्डिले यांची मागणी लक्षात घेऊन मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून दिल्याबद्दल मुळा, प्रवरा नदीपट्ट्यातील सर्व गावातील ग्रामस्थ, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Mula Dam
Ahilyanagar Municipal Corporation Tax Recovery: दिवाळी बोनससाठी महापालिकेची धावपळ; महिनाभरात ११ कोटींच्या वसुलीचे टार्गेट

राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रात मानोरी, मांजरी, डिग्रस, वांजुळपोई, केसापूर, पाथरे, वांगी व नांदगाव या आठ बंधाऱ्यातील पाण्यामुळे शेतीसह पशुधनाला दिलासा मिळणार आहेत.

Mula Dam
Nevasa Firing Case: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तरुणावर गोळीबार; १० जणांविरुद्ध गुन्हा

यंदा परतीचा पाऊस न झाल्याने पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याबरोबर पशुधन शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून हे बंधारे भरून द्यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला. आ. तनपुरे व आ. कर्डिले यांनीही पालकमंत्र्यांना पाणी सोडण्यासाठी आग्रह लावून धरला होता.

Mula Dam
Farmers Problems During Drought: दुष्काळात शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी; पंचनामेही स्वतःच करा, प्रशासनाचे नवे संकट!

पालकमंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यात दुष्काळ आढावा बैठकीत आमदारांसह शेतकरी, कार्यकर्त्यांनी नदीपात्रात पाणी सोडून बंधारे भरून देण्याची मागणी केली. या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पालकमंत्र्यांनी मेळाव्यातच तातडीने नदीपात्रात पाणी सोडून बंधारे भरून देण्याचे आदेश प्रशासनाला देत बंधारे भरून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Mula Dam
Student Mental Health Awareness: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सौंदाळा गावाचा पुढाकार; ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव

बेसुमार उपसा करू नये

दुष्काळाची तीव्रता असल्याने पिण्याचे पाणी व पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नास प्राधान्य असल्याने शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा करू नये. काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.

ऐन पावसाळ्यात उन्हाळा भासत असताना मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे व दोन्ही आमदार तसेच दूरदृष्टीचे नेते माजी खा. तनपुरे यांचे आभार. आमच्या भागात वाळू टिकून असल्याने पाणी जिरत असल्याने निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

डॉ. जयवंत गुडदे सदस्य, मुळा पाणी आरक्षण हक्क समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news