Ahilyanagar Water Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट; १९६ टँकरने पाणीपुरवठा

चार दिवसांत सात गावे आणि ५५ वाड्यांमध्ये टंचाई; ३.७७ लाख नागरिकांना टँकरचा आधार, पाथर्डीत सर्वाधिक ८१ टँकर
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्‍या चार दिवसांत नव्‍याने ७ गावे आणि ५५ वाड्यांत पाणीटंचाईच्‍या झळा बसल्‍या आहेत. यामध्‍ये पाथर्डी तालुक्‍यातील ४ गावे व ३२ वाड्यांचा समावेश आहे. त्‍यामुळे चार दिवसांत नव्‍याने आठ टँकर वाढविण्‍यात आले. त्‍यामुळे नऊ तालुक्‍यांतील ३ लाख ७७ हजार २४४ लोकसंख्‍येसाठी १९६ टँकर धावत आहेत. पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक ८१ टँकर सुरु आहेत.

Water Tanker
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेसाठी विखे, थोरात आणि राम शिंदे एकत्र; बिनविरोध निवडणुकीसाठी आज खलबते

उन्‍हाळ्याबरोबरच ऐन पावसाळ्यातही संगमनेर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर व अहिल्‍यानगर तालुक्‍यांत टँकर सुरुच होते. यंदा सरासरीपेक्षा कमी म्‍हणजे चार महिन्‍यांत फक्‍त २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत बहुतांश महसूल मंडलांत पावसाचा मोठा खंड पडला होता.

Water Tanker
Ahilyanagar Dussehra Shopping: अहिल्यानगरमध्ये दसरा खरेदीची धूम; बाजारपेठांत कोट्यवधींची उलाढाल

सप्‍टेंबर महिन्‍यात भूजलपातळी तपासली असता जवळपास तीन मीटरने भूजलपातळी खालावली असल्‍याचे पुढे आले. त्‍यामुळे जलस्‍त्रोत कोरडे पडल्‍याने टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या दिवसेंदिवस वाढू लागली. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण होऊन तेथे चार टँकर सुरु झाले. पारनेर शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्‍याने जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगरपंचायत असलेल्‍या पारनेर शहरासाठी आठ टँकर सुरु केले आहेत.

Water Tanker
Jamkhed Road Damage: जामखेडमध्ये रस्त्याचे नुकसान; फायबर कंपनीला ५५.६८ लाखांचा दंड, तरी खोदकाम सुरूच!

चार दिवसांत पाथर्डी तालुक्‍यातील चार गावे आणि ३२ वाड्यांत, शेवगाव तालुक्‍यातील २ गावे आणि १९ वाड्यांत तर कर्जत तालुक्‍यातील १ गाव आणि चार वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली.या टंचाईग्रस्‍त गावे आणि वाड्यांतील जनतेसाठी आठ टँकर मंजूर करण्‍यात आले आहेत.त्‍यामुळे आजमितीस १८३ गावे आणि १ हजार ७७ वाड्यांसाठी १९६ टँकर सुरु आहेत.

Water Tanker
Godavari Water Protest: गोदावरीच्या बंधाऱ्यांसाठीचे आंदोलन स्थगित; विखे पाटलांचे चार दिवसांत तोडग्याचे आश्वासन

तालुकानिहाय टँकर

पाथर्डी : ८१, कर्जत : ३०, शेवगाव : २३, अहिल्‍यानगर : १९, जामखेड : १६, संगमनेर : ८, पारनेर: ५, श्रीगोंदा: ४, नेवासा: २, पारनेर शहर: ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news