Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेसाठी विखे, थोरात आणि राम शिंदे एकत्र; बिनविरोध निवडणुकीसाठी आज खलबते

सर्वसाधारणच्या सात जागांसह ओबीसी आणि महिला राखीव जागांवर चर्चा; नीलेश लंके बैठकीपासून दूर, इच्छुकांच्या उमेदवारीकडे लक्ष
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज मंगळवारी (दि. २०) एकत्र येणार आहेत. विजयादशमीचा मुर्हूतावर तिघांच्या होणाऱ्या बैठकीत सोसायटी मतदारसंघ वगळता सर्वसाधारणच्या सात जागांवर तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीत तिघांचे मनोमिलन होते की कसे? याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Dussehra Shopping: अहिल्यानगरमध्ये दसरा खरेदीची धूम; बाजारपेठांत कोट्यवधींची उलाढाल

दरम्यान, या तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर इच्छुकांसोबतही बैठक होणार असल्याचे आणि त्यासाठी काहींना खास निरोपही दिल्याचे समजते. संगमनेरला झालेल्या बाळासाहेब थोरात - डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीपासून सभापती प्रा. राम शिंदे यांना दूर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून प्रा. शिंदे यांनी बँक निवडणुकीत विस्थापितांची मोट बांधण्यास सुरुवात केली. विखे पाटलांकडून मात्र चर्चेची दारे खुले असल्याचे सांगत पदाचा सन्मान राखला जाईल, असे सांगितले गेले. त्यानंतर सभापती शिंदे व विखे पाटील यांची बैठक कधी होणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागून होती. अखेर त्याला विजयादशमीचा मुहूर्त लाभला.

Ahilyanagar District Bank
Jamkhed Road Damage: जामखेडमध्ये रस्त्याचे नुकसान; फायबर कंपनीला ५५.६८ लाखांचा दंड, तरी खोदकाम सुरूच!

अहिल्यानगरमधील शासकीय विश्रामगृहावर विखे-शिंदे व थोरात या तिघांची बैठक होत आहे. या बैठकीत सोसायटीच्या उर्वरित १२पैकी काही जागांसह अन्य सात जागांबाबत चर्चा होणार आहे. विखे-थोरात हे सहकारातील मातब्बर नेते असून बँकेवर नेहमीच त्यांचे वर्चस्व राहिले आहेत. प्रा. शिंदे सहकारात नवखे असले तरी त्यांनाही काही जागा देण्यात येणार असून त्यातून बिनविरोधाचे गणित सोडवले जाणार असल्याचे समजते.

Ahilyanagar District Bank
Godavari Water Protest: गोदावरीच्या बंधाऱ्यांसाठीचे आंदोलन स्थगित; विखे पाटलांचे चार दिवसांत तोडग्याचे आश्वासन

खासदार बैठकीपासून दूरच

शिंदे-विखे-थोरात यांच्या बैठकीचे निरोप ठरावीक नेत्यांना गेले आहेत. त्यांची किंवा समर्थकांची उमेदवारी निश्चित होणार की थांबण्यास सांगितले जाणार हे त्या वेळी ठरणार आहे. खा. नीलेश लंके यांनी पारनेर सोसायटीतून तयारी चालविली असली तरी त्यांना या बैठकीपासून दूर ठेवल्याचे समजते.

सभापती शिंदे-गडाख चर्चा

सभापती राम शिंदे हे विश्रामगृहावरील बैठकीपूर्वीच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेणार आहेत. बँक निवडणूक बिनविरोधासाठी गडाखांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले होते. गडाख हे सहकारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. शिंदे-गडाख भेटीत बँकेची चर्चा होणार असून त्यानंतर विखे-थोरात-शिंदे यांची बैठक होत आहे. त्यामुळेच शिंदे-गडाख भेटीला महत्त्व आले आहे.

अकोले, श्रीगोंदा, पारनेर अडचणीचे

सोसायटी मतदारसंघाच्या १४ अकोले, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात अडचण असल्याचे संकेत दिले जात आहे. कर्जतमध्ये सभापती शिंदे यांनी सहलीवर पाठवलेले मतदार पाहता तेथे अंबादास पिसाळ यांना थांबावे लागणार असल्याचे चित्र आहे. जामखेडच्या जागेवर सभापती शिंदे हे आग्रही असून तेथे ओढाताण होण्याची शक्यता वर्तवली जाते. याशिवाय सर्वसाधारणच्या सातमधील दोन जागा शिंदे यांना हव्या आहेत. त्यावर कसा तोडगा निघणार हे आजच्या बैठकीनंतर समोर येणार आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District Bank Election: नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; मुंबईतील नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

ओबीसींची जागा कोणाला?

गतवेळी काँग्रेसचे करण ससाणे प्रतिनिधित्व करत असलेली ओबीसी जागेवर मधुकर नवले, प्रशांत गायकवाड, आदिनाथ हजारे, नीरज मुरकुटे, कारभारी जावळे, आ. विठ्ठलराव लंघे हे दावेदार आहेत. ससाणे हे श्रीरामपूर सोसायटीतून इच्छुक आहेत. गायकवाड यांच्यासाठी आ. काशिनाथ दाते, हजारे यांच्यासाठी सभापती शिंदे, नातू नीरजसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे व जावळेंसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाला? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राहुल जगताप लढणार की थांबणार?

श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील कुकडी साखर कारखाना जिल्हा बँकेने जप्त केला आहे. जगताप यांना थांबवण्यासाठी कारखाना जप्तीनंतर ‘लिलावास्त्राचा’ वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच राहुल जगताप उमेदवारी मागे घेणार, की जिल्हा बँकेसाठी कारखाना पणाला लावणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांची भूमिका बुधवारी स्पष्ट होणार आहे.

शेतीपूरक आ. काळे, बिगरशेतीतून जगताप?

शेतीपूरक मतदारसंघातून कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांना तर बिगरशेती मतदारसंघातून दिवंगत आ. अरुणकाका जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप यांची उमेदवारी अंतिम मानली जाते. गतवेळी आ. काळे हे बिगरशेतीमधून बिनविरोध झाले होते. यंदा मात्र शेतीपूरकमधून उमेदवार असलेले आ. काळे यांच्यासमोर दत्तात्रेय पानसरे, सुधीर रावसाहेब म्ह्स्के, हर्षदा काकडे याशिवाय ‘कर्जत-जामखेड’चेही दोन अर्ज आहेत. सचिन जगताप यांच्या बिनविरोधासाठी आ. संग्राम जगताप हे प्रयत्नशील आहेत.

महिलांच्या दोन जागांवर रस्सीखेच

महिला राखीवच्या दोन जागा आहेत. अनुराधा नागवडे, मंजूषा गुंड, रत्नमाला लंघे, सोनल गायकवाड, संगीता वाघ, सुप्रिया झावरे, संजीवनी शिंदे, मीनाक्षी साळुंके, गीतांजली शेळके, मनीषा राळेभात अशी मातब्बर नावे या मतदारसंघात आहेत. महिलांच्या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. विखे, थोरात आणि शिंदे तिघांचेही समर्थक इच्छुक असल्याने तेथे मोठी रस्सीखेच असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news