Ahilyanagr Marriage Fraud: लग्नासाठी ४ लाख घेतले; महिनाभरातच वधूची फसवणूक उघड, राहुरीत खळबळ

मुंबईतील एजंट महिलेने जुळवून दिले लग्न; पूर्वीचे लग्न व चार मुले असल्याचे समोर आल्याचा वराच्या कुटुंबीयांचा दावा
Marriage Fraud
Marriage FraudPudhari
Published on: 
Updated on: 

राहुरी: लग्नासाठी वधूच्या शोधात असलेल्या तालुक्यातील एका तरुणाला मुंबईतील एका एजंट महिलेने तरुणी दाखवली. विवाह जुळवून देण्यासाठी वराकडून चार लाख रुपये रोख घेत विवाह लावून दिला. मात्र, लग्नाला अवघा महिना उलटत नाही तोच या विवाहामागील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. वर व त्याच्या नातेवाइकांनी संबंधित वधूसह तिच्या साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Marriage Fraud
Ahilyanagr Mula Dam: मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले; २,५०० क्युसेकने पाणी सोडले, ३,१२३ हेक्टरला सिंचनाचा लाभ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली फाटा येथील तरुण विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्याचदरम्यान मुंबई येथील एका एजंट महिलेने त्याला मुंबईतील तरुणी दाखवली. विवाह जुळवून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर महिनाभरापूर्वी दोघांचा विवाह लावून दिला.

Marriage Fraud
Ahilyanagr Bal Sangopan Yojana: बालसंगोपन योजनेला ३० कोटींचा दुसरा हप्ता; दीड लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार दिलासा

विवाहानंतर संबंधित तरुणी काही काळ वराच्या घरी राहिली. मात्र, संबंधित तरुणीचे यापूर्वीच लग्न झाले असून तिला चार मुले असल्याचे समोर आले. तसेच तिला दारू आणि गुटखा सेवनाचे व्यसन असल्याचेही वराच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

Marriage Fraud
Ahilyanagr Kopardi Case: कोपर्डी प्रकरण: मृत्युदंडाच्या अपिलावर सुनावणी; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वरासह त्याच्या कुटुंबियांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेतला. अखेर काल शुक्रवारी (दि.२) दुपारी नवरदेव व त्याच्या नातेवाइकांनी वधूसह तिच्या काही साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Marriage Fraud
Ahilyanagr District Bank Election: जिल्हा बँकेच्या राजकारणात नवे समीकरण; पिचड-गायकर ‘पॅचअप’च्या मार्गावर!

खातरजमाचे आवाहन

ग्रामीण भागातील अनेक तरुणांना विवाहासाठी वधू मिळत नसल्याने ते विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थ व एजंटांवर अवलंबून राहतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहे. त्यामुळे विवाह जुळविताना संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी, ओळख आणि वैवाहिक स्थितीची खातरजमा करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news