Ahilyanagar Social Welfare Department: अहिल्यानगरच्या समाजकल्याण विभागात लाचखोरीचे जाळे? निरीक्षकाच्या अटकेनंतर अन्य अधिकारीही रडारवर

मंत्रालयीन कामकाजासाठी लाच घेतल्याची निरीक्षकाची कबुली; शिष्यवृत्ती, बचत गट आणि योजनांच्या निधीबाबतही तक्रारी, चौकशी अहवालाबाबत प्रश्नचिन्ह
Bribe Case
Bribe Case Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नगर: विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अडवणूक, बचत गटांची केली जाणारी पिळवणूक, विविध योजनांना निधी मिळवण्याकरीता ठेकेदारांना मोजावी लागणारी ‘किंमत’, लाभार्थ्यांसोबत मनमानी, अपमानास्पद वागणूक आदी कारणांमुळे चर्चेतील समाजकल्याण विभाग आता लाचखोरीने पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. समाजकल्याण निरीक्षकाला लाच घेताना पकडल्यानंतर आता तेथील अन्य अधिकारीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आल्याचे समजते.

Bribe Case
Ahilyanagar NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नगरमध्येही चर्चा; मुंबईतून पदाधिकाऱ्यांना फोन, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची तयारी

‘मंत्रालय आणि कार्यालयीन कार्यवाही’साठी लाच घेतल्याची कबुली समाज कल्याण निरीक्षक संदीप फुंदे याने दिल्याने त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयात पोहचल्याची चर्चा आहे. समाज कल्याण विभागातील तसेच मंत्रालयातील लाचखोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे काय? यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Bribe Case
Ahilyanagar Water Wastage: अहिल्यानगरमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्या १६ जणांना दंड; महापालिकेची धडक कारवाई

सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागातून स्वाधारसह, अनेक विद्यार्थी अन् जनहिताच्या योजना राबवल्या जातात. मात्र, आर्थिक तक्रारीही वाढत्याच आहे. शिष्यवृत्ती योजनेत अडवणूक केली जाते, ट्रॅक्टरचा लाभ देताना बचत गटांना ‘झळ’ दिली जाते, योजनेचा निधी वर्ग करताना ‘टोल’ फाडावा लागतो, अशा अनेक तक्रारी असल्याचीही चर्चा आहे.

Bribe Case
Sujay Vikhe Patil: संयम, मुत्सद्देगिरी अन् अचूक राजकीय खेळी; सुजय विखेंचा जिल्हा बँकेत 'सुजय’!

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असताना, संत रोहिदास विकास केंद्र उभारणीच्या कामाचे बील काढून देण्यासाठी निरीक्षकांनी ठेकेदाराची अडवणूक केली. महापालिकेचे काम असल्याने त्यांनी या संदर्भात समाजकल्याण विभागाकडे पत्रव्यवहारही केला. मात्र, बिल काढण्यासाठी लाच मागितली गेली.

Bribe Case
Sonai Tempo Crime: सोनईत भरदिवसा टेम्पो चालकाची चाकूने भोसकून हत्या; मारेकरी पसार

पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

अहिल्यानगर जिल्हा प्रशासन घोडदौड करत असताना, दुसरीकडे समाजकल्याणसारख्या काही विभागांमुळे गालबोट लागत आहे. अशा विभागप्रमुखांचेही कान टोचण्याची आवश्यक्ता व्यक्त होत आहे. तसेच जिल्हा परिषदेतही काही विभागात अशाच प्रकारे ‘खेळ’ सुरू असून, पालकमंत्र्यांनी स्वतः याची शहानिशा करावी, अशी मागणी होत आहे.

‘तो’ चौकशी अहवाल कुठंय?

जिल्ह्यातील काही महाविद्यालयात शिष्यवृत्तीमधील अपहार आणि अनियमिता संदर्भात सहायक आयुक्त यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यावर चौकशी झाली का, त्याच्या अहवालात काय तथ्थ समोर आले, याची कमालीची गोपनियता पाळली जात आहे. त्यामुळे ही चौकशीच चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.