Ahilyanagar Shooting Incident: महिलेवर गोळी झाडून तरुणाने संपविले जीवन

सावेडीतील भगवानबाबा चौक परिसरात भरदिवसा घटना; जखमी महिलेची प्रकृती स्थिर
Gun
GunPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: महिलेवर गोळी झाडून पसार झालेल्या तरुणाने कापूरवाडी येथे जाऊन स्वत:वर गोळी झाडत जीवनयात्रा संपविली. सावेडीतील भगवानबाबा चौक परिसरातील अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (दि.२३) भरदिवसा हा थरार घडला.

गोळीबारात जखमी महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. योगेश सोमनाथ डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ‘नाजूक’ कारणातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Gun
El Nino Forecast: अल निनोचा प्रभाव वाढणार; महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

जखमी ३५ वर्षीय महिला भगवानबाबा चौकातील अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहते. ही महिला व डोंगरे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे होते. दोघेही अपार्टमेंटमध्ये असताना त्यांच्यात काही तरी कारणातून वाद झाला. त्यातूनच तरुणाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात महिला जखमी झाली. त्यानंतर डोंगरे तेथून पसार झाला.

माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, एलसीबीचे निरीक्षक संतोष मुटकुळे, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gun
Tamasha Artists Financial Crisis: दुष्काळाचा तमाशा कलावंतांनाही फटका; मोहटादेवीच्या चरणी आर्थिक मदतीसाठी साकडे

पसार झालेल्या तरुणांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधादरम्यान कापूरवाडी परिसरात त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news