El Nino Forecast: अल निनोचा प्रभाव वाढणार; महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

प्रशांत महासागरात अल निनो तीव्र होण्याची शक्यता; बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्मितीसाठी अनुकूल स्थिती
Rain
RainPudhari Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: विषुववृत्तीय प्रशांत महासागरात 'अल निनो'ची स्थिती प्रबळ ते अत्यंत प्रबळ स्वरूपाची आहे. मध्य पूर्व आणि पूर्व प्रशांत भागात समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत ही स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

‘मान्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टीम’च्या अंदाजानुसार, जानेवारी ते मार्च २०२७ पर्यंत ही तीव्र ते अतितीव्र स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ची स्थिती तटस्थ आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही भागांत समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये पश्चिम भागात अधिक उष्णता दिसून येत आहे.

Rain
Graduate & Teachers Constituency Election | ‘पदवीधर’साठी ६२.७८ %, तर शिक्षक मतदारसंघात ८५.८७ % मतदान

संपूर्ण पूर्वानुमान कालावधीत ‘न्यूट्रल’ (तटस्थ) स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झालेला असला तरी महाराष्ट्रात मात्र २८ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता नाही.

मेडियन ज्युलियन ऑसिलेशनची स्थिती महत्त्वाची

मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) सध्या तिसऱ्या टप्प्यात असून संपूर्ण कालावधीत ते याच टप्प्यात राहण्याची शक्यता आहे.

Rain
Chandrakant Patil: "माझ्या वक्तव्याची चेष्टा..."; गोकुळ निवडणुकीतील '२५-०' च्या व्हायरल व्हिडिओवर चंद्रकांत पाटलांचा संताप

२४ ऑक्टोबरपासून त्याचे आयाम १ पेक्षा जास्त होऊ शकते. अशा प्रकारे एमजेओची स्थिती उत्तर हिंदी महासागरात आहे. ज्यामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा समावेश होतो. आगामी आठवड्यादरम्यान चक्रीवादळ निर्मितीसाठी स्थिती अनुकूल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news