Sangamner MSEDCL Lineman Attack: वीज तोडल्याने वायरमनला मारहाण करून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न; संगमनेरात गुन्हा दाखल, दोघांना अटक

थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित केल्याचा राग; ओंकार सातपुते यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

संगमनेर: थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून संगमनेर खुर्द येथे दोघांनी महावितरणच्या २४ वर्षीय वायरमनला बेदम मारहाण करून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अजीज उर्फ बाबू छोटू कुरेशी (वय २८) आणि मोबीन शाकीब कुरेशी (वय २६, दोघेही रा. संगमनेर खुर्द) यांना अटक केली आहे.

महावितरणच्या पिंपरणे कक्षांतर्गत कार्यरत असलेले ओंकार भानुदास सातपुते हे वरिष्ठांच्या सूचनेनुसार थकीत वीजबिलापोटी वीजजोड खंडित करण्यासाठी गेले होते. यावेळी रोहित्रावरून गावठाणचा वीजपुरवठा खंडित करून ते दुचाकीने पुढील कारवाईसाठी निघण्याच्या तयारीत असताना दोन जणांनी वायरमन यांना अडवले.

Arrested
Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या शिक्षण विभागात खळबळ! शिक्षकांच्या जुन्या मान्यतांची होणार तपासणी

अजीज कुरेशी याने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली, तर मोबीन कुरेशी याने वीजपुरवठा बंद केला म्हणून शिवीगाळ करत त्यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर दोघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, एका व्यक्तीने मध्यस्थी करून सातपुते यांची सुटका केली. मात्र, जीवाच्या भीतीने ते शेतातून पळत असताना दोघांनी चारचाकी वाहनातून त्यांचा पाठलाग केला. त्यांना दोन वेळा कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. सातपुते यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाने मदत करून त्यांना महावितरणच्या कार्यालयात सुरक्षित पोहोचवले.

Arrested
Kharif Crop Damage: अहिल्यानगरमध्ये खरीप पिकांचे नुकसान; १२ लाख शेतकऱ्यांसाठी १,३६५ कोटींची मदत अपेक्षित

महावितरणचे वायरमन ओंकार सातपुते यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून शासकीय कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावताना होणाऱ्या हल्ल्यांबाबत कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेने कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.