Ahilyanagar Population Census 2027: अहिल्यानगरची लोकसंख्या ५० लाखांपार जाण्याची शक्यता; मतदारसंघ पुनर्रचनेकडे लक्ष

२०२७ मध्ये होणार जनगणना; लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा, संख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता
Census 2027 Digital India
Census 2027 Digital IndiaPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: आगामी जनगणना आणि त्यानंतर संभाव्य लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोकसंख्येकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सन 2001 आणि 2011 या दोन जनगणनांमधील आकडेवारीनुसार जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे पाच लाखांनी वाढली होती. आता 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या 50 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसंख्येतील या वाढीचा भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेवर काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. दि. 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत ही जनगणना होणार आहे.

Census 2027 Digital India
Karjat Student Assault Case: स्कॉलरशिपच्या मेसेजवरून विद्यार्थ्याचे अपहरण; जंगलात नेऊन बेदम मारहाण

जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. जनगणनेत नागरिकांची लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती यासह विविध माहिती संकलित केली जाते. तर डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये लोकसंख्येची आकडेवारी, घटनात्मक तरतुदी आणि मतदारसंघांच्या सीमा व आरक्षण निश्चित केले जाते. 84 व्या घटनादुरुस्तीनुसार मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, त्यासाठी 2027 ची जनगणना लक्षात घेतली जाणार की डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर करताना 2011 चीच लोकसंख्या गृहीत धरली जाणार, याविषयी संभ्रम आहे.

Census 2027 Digital India
CM Samruddha Panchayat Raj Abhiyan: पारदर्शीपणामुळे पंचायत राज अभियान यशस्वी होईल; वशिलेबाजीवर राम शिंदेंचा प्रहार; मंत्री गोरे यांचे कौतुक

2009 मध्ये मतदार संघाची तोडफोड!

यापूर्वी 2001 च्या जनगणनेच्या आधारे डिलिमिटेशन कायदा 2002 अंतर्गत मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया झाली होती. 12 जुलै 2002 रोजी डिलिमिटेशन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने केलेल्या पुनर्रचनेचे आदेश 2008 मध्ये लागू झाले आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत नव्या मतदारसंघ रचनेनुसार मतदान झाले. त्यावेळी जिल्ह्यातील मतदार संघाची झालेली तोडफोड पहायला मिळाली होती. त्यात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनीही लक्ष घातल्याचे दिसले होते.

Census 2027 Digital India
Sant Bhagwanbaba Multistate Credit Society: भगवानबाबा मल्टिस्टेटवर अवसायक नेमा; खातेधारकांची मागणी

लोकसंख्येतील वाढ काय सांगते?

सन 1991 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाख 72 हजार 935 होती. 2001 मध्ये ती वाढून 40 लाख 80 हजार 777 झाली. म्हणजेच या दहा वर्षांत लोकसंख्येत सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख 43 हजार 159 इतकी झाली. 2001 च्या तुलनेत या दशकातील लोकसंख्या वाढ सुमारे 12.44 टक्के होती. आता 2027 च्या जनगणनेत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती असेल, याकडे लक्ष लागले आहे. मागील दशकातील वाढीचा कल कायम राहिल्यास जिल्हा 50 लाखांचा टप्पा ओलांडू शकतो.

Census 2027 Digital India
NMMS App Problems: आदिवासी भागात रोजगार हमी योजनेला तांत्रिक अडचणींचा विळखा

डिलिमिटेशनचा निर्णय कधी?

2026 मध्ये केंद्र सरकारने डिलिमिटेशनसंदर्भातील विधेयक संसदेत मांडले होते. मात्र, ते विधेयक मंजूर झाले नाही. त्यामुळे नवीन मतदारसंघ रचनेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. 2027 च्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर घटनात्मक तरतुदी आणि संसदेने केलेल्या कायद्यानुसार पुढील प्रक्रिया निश्चित होईल. त्यानंतरच अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची संख्या, सीमा आणि आरक्षण यामध्ये काय बदल होणार, याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

शासनाकडून डिलिमिटेशन प्रक्रियेबाबत अदयाप आम्हाला सूचना नाहीत. मात्र दि. 25 जानेवारीपासून जनगणना सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. साधारणतः 34 दिवसांची जनगणनेची प्रक्रिया असेल. ती पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होऊ शकते.

सुनील गाढे, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.