Karjat Student Assault Case: स्कॉलरशिपच्या मेसेजवरून विद्यार्थ्याचे अपहरण; जंगलात नेऊन बेदम मारहाण

७ ते ८ जणांचा हल्ला; सोन्याचे बदाम ओरबाडले, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
Karjat Student Assault Case
Karjat Student Assault CasePudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: वर्गातील मुलीने पाठविलेल्या ‘स्कॉलरशिपचा फॉर्म भरला का?’ या मेसेजला ‘अजून भरला नाही, नंतर भरणार आहे’ असा रिप्लाय दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून सात-आठ जणांनी बेदम मारहाण केली. कर्जत येथील या घटनेनंतर चिंचोली काळदात येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी कर्जत पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींवर गुन्हे नोंदवून तत्काळ अटकेची मागणी केली.

Karjat Student Assault Case
CM Samruddha Panchayat Raj Abhiyan: पारदर्शीपणामुळे पंचायत राज अभियान यशस्वी होईल; वशिलेबाजीवर राम शिंदेंचा प्रहार; मंत्री गोरे यांचे कौतुक

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष रघु आबा काळदाते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप काळदाते, भाजपचे नेते व उपसरपंच गणेश काळदाते, सुनील पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Karjat Student Assault Case
Sant Bhagwanbaba Multistate Credit Society: भगवानबाबा मल्टिस्टेटवर अवसायक नेमा; खातेधारकांची मागणी

अनिकेत अनिल काळदाते (वय १९, रा. चिंचोली काळदात) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, तो दादा पाटील महाविद्यालयात 'एस.वाय. बी.सी.एस.' या वर्गात शिकतो. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास तो महाविद्यालयातून पेपर देऊन बाहेर पडला तेव्हा दोन अनोळखी तरुणांनी त्याला गाठले. एकाने आकाश तोरडमल असे स्वतःचे नाव सांगत अनिकेतला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पठारवाडी फाट्यामार्गे बहिरोबावाडीच्या जंगलात नेले.

Karjat Student Assault Case
NMMS App Problems: आदिवासी भागात रोजगार हमी योजनेला तांत्रिक अडचणींचा विळखा

तेथे आणखी चार ते पाच दुचाकींवरून आलेल्या ७ ते ८ जणांनी ‘मुलीला मेसेज का केला?’ असे विचारत अनिकेतला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि चैनने बेदम मारहाण केली. मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि ‘तुझा संतोष देशमुख करतो,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी गणेश विलास तोरडमल याने त्याच्या गळ्यातील सोन्याचे बदामही ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Karjat Student Assault Case
Jayakwadi Dam water protest: पाण्यासाठी ४६ गावांचा एल्गार; बैलगाड्यांसह गावकऱ्यांचा खरवंडीत महामार्गावर चक्काजाम

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत अनिकेतने कसेबसे घर गाठले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात आकाश तोरडमल, गणेश विलास तोरडमल, विटेकर (पूर्ण नाव-पत्ता समजले नाही) आणि इतर ७ ते ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल नवनाथ भिताडे तपास करीत आहेत.

ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

या अमानुष आणि जीवघेण्या हल्ल्याचे तीव्र पडसाद चिंचोली काळदात गावात उमटले. संतप्त ग्रामस्थांनी कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या दालनात ठिय्या मांडला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रघु आबा काळदाते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप काळदाते, भाजपचे गणेश काळदाते, सुनील पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.