Ahilyanagar Municipal Vice President Election: उपनगराध्यक्ष निवडीची रणधुमाळी; पाच नगरपालिकांच्या पहिल्या सभा निश्चित

श्रीगोंदा, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा येथे 12 व 13 जानेवारीला महत्त्वपूर्ण सभा
Vice President Election
Vice President ElectionPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यातील बारा नगरपालिकांतील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विद्यमान नगराध्यक्षांकडून पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची लगबग सुरु झाली आहे. श्रीगोंदा नगरपालिकेची पहिली सभा 12 जानेवारी रोजी तर देवळाली प्रवरा, शिर्डी, राहाता व राहुरी नगरपालिकांची सभा 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्षपदाबरोबरच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

Vice President Election
Ahilyanagar Municipal Election Cash Seizure: महापालिका निवडणुकीत पैशांचा खेळ उघड! दुचाकीच्या डिक्कीत सापडले एक लाख

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, देवळाली प्रवरा व पाथर्डी नगरपालिका व नेवासा नगरपंचायत आदी बारा पालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या पालिकांवर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत.

Vice President Election
Ghotan Village CCTV Installation: घोटण गावात सुरक्षा सुधारासाठी सीसीटीव्ही आणि एलईडी टीव्ही बसवले

आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याचा अधिकार नूतन नगराध्यक्षांना आहे. त्यानुसार श्रीगोंदा पालिकेचे नगराध्यक्ष सुनिता संतोष खेतमाळीस यांनी 12 जानेवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.

Vice President Election
Jamkhed Road Accident: जामखेडमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी 13 जानेवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा तर शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री विष्णू थोरात यांनी शिर्डी पालिकेची पहिली सभा 13 जानेवारी रोजी आयोजित केली आहे.

Vice President Election
Illegal Slaughterhouse Action: तिसगाव येथील अनधिकृत कत्तलखाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त

राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर यांनी 13 जानेवारी रोजी तर राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी देखील पहिली सर्वसाधारण सभा 13 जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या पाच नगरपालिकांचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news