Ahilyanagar Nominated Corporator Selection: अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीला वेग

राष्ट्रवादीला तीन, भाजपला दोन जागा; बंद पाकिटात कोणाचे नाव याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी, भाजपमधील इच्छुकांनी हायकमांडकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीला तीन, भाजपला दोन स्वीकृत सदस्यांच्या जागा मिळणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गटनेत्यांकडून बंद पाकिटात कोणाचे नाव दिले जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Pathardi Police Scorpio Theft: पाथर्डीत पोलिस ठाण्यातून जप्त स्कार्पिओ चोरीला

महापालिकेची पहिली सर्व साधारणसभा 26 फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे. पहिल्याच सभेमध्ये स्थायी समिती सदस्य निवड, महिला व बालकल्याण समिती सदस्य निवड आणि स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी होणार आहेत. स्थायी समिती 16 व महिला व बालकल्याण समितीसाठी 16 सदस्यांची निवड होणार आहेत. त्यासाठी गटनेते सदस्यांच्या नावाची शिफारस करणार आहेत.

Ahilyanagar Municipal Corporation
Shrigonda Kolgaon Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात; भावी नवरदेवासह चौघांचा मृत्यू

दुसरी सर्वसाधारण सभा महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली लगेचच दुपारी होणार आहे. या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादीच्या इच्छुकांची चांगलीच फिल्डिंग लावली आहे. भाजप राष्ट्रवादीची दोन्ही पक्षांची रणनीती एकाच आहे. राष्ट्रवादीमध्ये आमदार संग्राम जगताप ठरवतील त्या उमेदवाराला स्वीकृत नगरसेवपदाची संधी मिळणार आहे. तर, भाजपमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ठरवतील तोच उमेदवार स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी दोन्ही नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. नेत्यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय कोणाचेही नाव पुढे जाणार नाही. त्यामुळे त्या बंद पाकिटात कोणाचे नाव जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोर लावला आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar RTE 25 Percent Admission Rule: आरटीई २५% प्रवेशात १ किमी हवाई अंतराची अट; ग्रामीण पालकांत संताप

भाजप कोणाचे पुनर्वसन करणार

महापालिका निवडणुकीत भाजपला 25 जागांवर विजय मिळाला. संख्या बळानुसार भाजपला दोन स्वीकृत सदस्य निवडून देता येणार आहेत. त्यामुळे भाजप कोणाचे पुनर्वसन करणार याची चर्चा आहे. निवडणुकीत भाजपने अनेक विद्यमान नगरसेवक पदाधिकाऱ्यांना थांबवत नवख्यांना उमेदवारी दिली. माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेवक मनिषा बारस्कर यांची नावे चर्चेत असून, सुवेंंद्र गांधी यांचेही नाव चर्चेत आहे.

राष्ट्रवादीची नावे मुंबईत फायनल होणार

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 27 जागा निवडून आल्या आहेत. संख्या बळानुसार राष्ट्रवादीला स्वीकृत सदस्यांच्या तीन जागा मिळणार आहे. त्यात ज्येष्ठ माजी नगरसेवक दगडूमामा पवार, बोल्हेगावचे पराभूत उमेदवार बाबासाहेब नागरगोजे यांची नावे चर्चेत आहेत. तिसरे नाव अद्यापि चर्चेत नाही. आमदार संग्राम जगताप विधानसभेच्या अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची स्वीकृत सदस्यांची नावे मुंंंबईतून फायनल होण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Armed Robbery Case: अहिल्यानगर तालुक्यात सशस्त्र दरोडे; नारायणडोह-चिंचोडी पाटीलमध्ये दोन जखमी

पात्रता पूर्ण करण्यासाठी कसरत

स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज करण्यासंदर्भात काही पात्रता आवश्यक आहेत. त्या पात्रता पूर्ण करण्यासाठी इच्छुकांची मोठी कसरत होणार आहे. डॉक्टर, निवृत्त मुख्याध्यापक, व्याख्याता, सनदी लेखापाल, सेवानिवृत्त अभियंता, सहायक आयुक्त, उपायुक्तपदी काम केलेला निवृत्त अधिकारी, सामाजिक संस्थेचा पदाधिकारी अशी पात्रता लागणार आहे. ती पात्रता पूर्ण करतात इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news