Ashok Kharat Cash Fraud: भोंदू अशोक खरातचा ‘कॅश ओनली’ घोटाळा उघड; लाखोंची फसवणूक समोर

बनावट रत्नांच्या नावाखाली रोकड व्यवहार; नेवासातील व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर भोंदूगिरीचा पर्दाफाश
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

सूर्यकांत वरकड

नगर: महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच भोंदू अशोक खरातने अनेकांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचेही समोर येत आहे. तंत्र-मंत्र आणि ज्योतिष विद्येची भीती दाखवत आर्थिक लूट करणारा भोंदू खरात मात्र धनादेश, ऑनलाइन पेमेंट घेत नव्हता, तर त्याला केवळ रोकडा हवा होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case
Ashok Kharat Fraud: भोंदू अशोक खरातची फसवणूक; नेवासातील व्यावसायिकाची लाखोंची लूट

नेवाशातील राजेंद्र नानासाहेब भागवत यांनी त्यांच्यासोबत घडलेली हकिगत माध्यमांसमोर मांडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. भागवत यांचा नेवाशात कापड व्यवसाय आहे. या व्यवसायातील अडचणीसंदर्भात मित्रांनी त्यांना भोंदू खरातचे नाव सुचविले. त्यानुसार भागवत हे नाशिकला कॅनडा कॉर्नर परिसरातील ‌‘ओकस‌’ कार्यालयात गेले.

Ashok Kharat Case
Jeur Solar Project Protest: जेऊर सौर ऊर्जा प्रकल्पावरून वाद; आदिवासी समाजाचा आंदोलनाचा इशारा

तेथे भोंदूने त्यांना सोन्याच्या अंगठीत राशीचे खडे टाकावे लागतील असा सल्ला दिला. हे खडे टाकण्यासाठी 2 लाख 62 हजार रुपये देण्याचे ठरले. पहिल्याच भेटीत भागवत यांनी 1 लाख रोकड दिली. दुसऱ्या भेटीत उर्वरित 1 लाख 62 हजार रुपयांचा धनादेश देतो, असे भागवत यांनी खरातला सांगितले.

Ashok Kharat Case
Ahilyanagar Municipal Employees Salary Issue: अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन; पगार रखडल्याने कामबंद

मात्र, त्याने धनादेश, ऑनलाईन, आरटीजीएस काहीच नको, केवळ रोकडाच हवा असा आग्रह धरला. भागवत यांनी सोबतचे मित्र सचिन राठोड व इतरांकडून 1 लाख 62 हजार रुपयांची रोकड जमा केली अन्‌‍ ती खरातला दिली. त्यानंतरच खरातने राशीचे खडे असलेल्या अंगठ्या भागवत यांना सुपूर्द केल्याची माहिती भागवत यांच्याशी संवादातून समोर आली.

Ashok Kharat Case
Shrirampur Pradhan Mantri Awas Yojana: श्रीरामपूरात घरकुलांचा खोळंबा; 5752 पैकी 3537 घरे प्रलंबित

लैंगिक शोषणानंतर शंका आली नि खरीही ठरली!

भोंदू अशोक खरातविरोधात महिलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भागवत यांना भोंदूने दिलेल्या अंगठ्या व राशीच्या खड्यांबाबत शंका आली. त्यांनी ओळखीच्या सराफाकडे धाव घेत सोन्याची व राशीच्या खड्यांची पडताळणी केली. त्या वेळी अंगठी सोन्याची नसून वेगळ्याच धातूची असल्याचे समोर आले. राशीचे खडेही बनावट असल्याचे समोर आल्यानंतर भोंदूच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला नि भागवत यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news