Ashok Kharat Fraud: भोंदू अशोक खरातची फसवणूक; नेवासातील व्यावसायिकाची लाखोंची लूट

‘दैवी शक्ती’च्या नावाखाली बनावट रत्न देऊन २.६२ लाखांची फसवणूक; अशोक खरातविरोधात गुन्हा नोंद
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

नेवासा: ‌‘पुष्कराज‌’ व ‌‘हिरा‌’ रत्न सोन्याच्या अंगठीत घातले, तर दैवी शक्ती प्राप्त होऊन व्यावसायिक भरभराट होईल असा सल्ला देत नाशिकच्या भोंदू अशोक खरातने प्रत्यक्षात पिवळ्या धातूमध्ये खोटे रत्न टाकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ashok Kharat
Jeur Solar Project Protest: जेऊर सौर ऊर्जा प्रकल्पावरून वाद; आदिवासी समाजाचा आंदोलनाचा इशारा

नेवाशाचे कापड व्यावसायिक राजेंद्र नानासाहेब भागवत यांनी भोंदू अशोक खरातने फसवणूक केल्याची फिर्याद नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. राजेंद्र नानासाहेब भागवत यांच्या फिर्यादीवरून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध व अधिनियम 2013चे 3(2) (3) अन्वये भोंदू खरातविरोधात गुन्हा नोंदविला आहे. 1 डिसेंबर 2022 ते 19 मार्च 2026 दरम्यान ही फसवणूक झाली. कापड व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणीचे निराकरण, प्रगतीसाठी भागवत हे मित्राच्या सल्ल्याने भोंदू अशोक खरातकडे गेले होते.

Ashok Kharat
Ahilyanagar Municipal Employees Salary Issue: अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन; पगार रखडल्याने कामबंद

कृष्णाचा अवतार आहे असे सांगून खरातने भागवत यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्यांमध्ये पुष्कराज व हिरा हे रत्न मंत्र टाकून नवीन अंगठ्या करून देतो, असा भोंदू ज्योतिषी सल्ला दिला. या रत्नामुळे दैवी शक्ती प्राप्त होईल, असे सांगून खरातने विश्वास संपादन केला. खरातच्या भोंदूगिरीला भूलून भागवत यांनी स्वत:कडील दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या रत्न टाकण्यासाठी खरातच्या हवाली केल्या. खरातने मात्र अस्सल सोने लुबाडले आणि पिवळ्या धातूच्या अंगठ्यांमध्ये पुष्कराज व हिरा रत्न टाकून देत दोन लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news