Ahilyanagar Leopard: नगर परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ; दोन बिबटे जेरबंद

सावेडीतील बिबट्या ड्रोनमध्ये कैद; खोसपुरी आणि पिंपळगाव उजैनीत बिबटे पिंजऱ्यात अडकले, शहरात शोधमोहीम सुरू
Leopard
Leopard Pudhari
Published on: 
Updated on: 

नगर: सावेडी उपनगरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सीक्यूएव्ही परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, वनविभागाच्या पथकाला बिबट्या चकवा देत आहे. काल (मंगळवारी) बिबट्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले आहेत. मात्र, अद्याप बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी दिली.

Leopard
Pathardi Court Employees Strike: समान काम, समान वेतनासाठी पाथर्डी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

सावेडी उपनगरातील दाट लोकवस्ती असलेल्या तारकपूर, प्रकाशपूर, सिव्हिल हडको परिसर, गंगा उद्यान परिसर, कलेक्टर ऑफिस रोड परिसर तसेच महापालिका कार्यालयाशेजारील सीक्यूएव्ही परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. वनविभागाचे पथक या परिसरात रात्रंदिवस गस्त घालत आहे. तसेच, ड्रोनच्या साह्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे. सीक्यूएव्ही परिसरात ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल दिसून आल्याने त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले आहेत.

तीन दिवस झाले तरी बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, बिबट्या आपल्या भागात आहे, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी न घाबरता खबरदारी घेणे आवश्यक आहे. रात्री अंधारात एकटे बाहेर पडू नये, तसेच लहान मुलांना बाहेर एकटे खेळू देऊ नये. बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तेलोरे यांनी केले आहे.

Leopard
Chakhale Wadi Water Shortage: गावात पाणी असूनही चखालेवाडीत पाणीटंचाई; ८५ वर्षांच्या ज्येष्ठांनाही पाण्यासाठी संघर्ष

खोसपुरीत आणखी दोन बिबट्यांचा वावर

तालुक्यातील खोसपुरी शिवारात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याच्या वावरामुळे दहशतीत असलेल्या शेतकरी व नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. डॉ. मोईन शेख यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि. १८) बिबट्या जेरबंद झाला. मात्र परिसरात आणखी दोन बिबट्यांचा वावर असल्याचा दावा नागरिकांनी केल्याने वन विभागासमोर आव्हान कायम आहे.

खोसपुरी शिवारातील डॉ. मोईन शेख यांच्या गट क्रमांक ८४/३ मधील शेतात मागील आठवड्यात वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. बुधवारी सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेरबंद बिबट्याला सुरक्षितपणे वनविभागाच्या कार्यालयात हलविण्यात आले. घेतली.

Leopard
Ahilyanagar Municipal Corporation: नगर महापालिकेच्या न्यायालयीन विभागावर नगरसेवकांचा संताप; पॅनलवरील वकिलांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

खोसपुरी, मजले चिंचोली, आव्हाडवाडी आणि उदरमल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा सातत्याने वावर होता. रात्रीच्या वेळी शेतात काम करताना, तसेच पशुधनाची देखभाल करताना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटनाही वारंवार घडत होत्या.

मागील आठवड्यात मजले चिंचोली येथील शेतकऱ्याच्या दहा शेळ्यांची बिबट्याने शिकार केली होती. डॉ. मोईन शेख यांच्या शेतातील सुमारे २५ ते ३० कोंबड्यांवरही बिबट्याने हल्ला केला होता. पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार खोसपुरी येथे पिंजरा लावण्यात आला आणि अखेर त्यात बिबट्या जेरबंद झाला.

Leopard
Nagar Leopard News नगर शहरात बिबट्याची दहशत; महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वावर

अधिकारी गायबच !

खोसपुरी येथे पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्यानंतर वनविभागाच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नाही. वन कर्मचारी संजय सरोदे यांनी नागरिकांच्या मदतीने बिबट्याला वनविभागाच्या कार्यालयात हलवले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपळगाव उजैनीतही बिबट्या जेरबंद

तालुक्यातील पिंपळगाव उजैनी येथे बुधवारी (दि. १८) पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला.

पिंपळगाव उजैनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. अनेक वेळा बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास आल्याने शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकरी तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे बुधवारी निदर्शनास आले. वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक मनेष जाधव, अशोक गाडेकर, विजय चेमटे यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन कार्यालयात हलविले. पिंपळगाव उजैनी परिसरातील ग्रामस्थांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.