Ahilyanagar Municipal Corporation: नगर महापालिकेच्या न्यायालयीन विभागावर नगरसेवकांचा संताप; पॅनलवरील वकिलांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचा विषय गाजला; माळीवाडा वेस प्रकरणी स्थगितीमुळे प्रशासनाला धारेवर धरले, सभेत पाणी, सीसीटीव्ही आणि क्यूआर कोडचा मुद्दाही चर्चेत
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणीच्या कामासाठी माळीवाडा वेस पाडण्याच्या कामास स्थगिती येते आणि महापालिकेच्या प्रारूप आराखड्याला स्थगिती येते. मग, महापालिकेचा न्यायालयीन विभाग नेमके काय काम करतो. पॅनलवरील वकील काय बाजू मांडतात. पुतळा उभारणीच्या विरोधात लोक जाणार हे संपूर्ण शहराला माहीत होते. मग, मनपाने अगोदरच उच्च न्यायालयात कॅव्हेट का दाखल केले नाही, असा सवाल उपस्थित करत स्थायी समितीत नगरसेवक निखील वारे, सुरेश बनसोडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी न्यायालयीन विभागासह मनपा प्रशासनाचे वाभाडे काढले.

Ahilyanagar Municipal Corporation
Nagar Leopard News नगर शहरात बिबट्याची दहशत; महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वावर

महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपायुक्त हरीनारायण येलगट्टे, नगरसचिव मेहेर लहारे, नगरसेवक मनोज कोतकर, आकाश कातोरे, मनोज दुलम, संध्या पवार, शहर अभियंता मनोज पारखे आदीसह विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच माळीवाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरून रणकंद झाले. पुतळा का उभारला जात नाही आणि माळीवाडा वेस पाडण्यास कामास स्थगिती मिळाली का याची सर्व माहिती न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्यांनी द्यावी, त्याशिवाय स्थायी समितीची सभा सुरू होणार नाही, अशी भूमिका नगरसेवक निखील वारे यांनी घेतली.

Ahilyanagar Municipal Corporation
Harishchandragad Kokan Kada: हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा बनतोय आत्महत्यांचे केंद्र; वर्षभरात सहा पर्यटकांचा मृत्यू

न्यायालयीन कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. महापालिका पॅनलवरील वकिलांवर लाखो रुपये खर्च करते परंतु, एकाही वकील न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडत नाही. पॅनलवरील वकील महापालिकेच्या केस फक्त हरण्यासाठी लढतात का असा सवाल नगरसेवकांनी उपस्‍थित केला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा संबंधित एजन्सीने बनविला आहे. मात्र, अद्याप त्याचे एकही बिल अदा करण्यात आलेले नाही. आता पुतळे आपल्याला मिळतात की नाही, याची शंका निर्माण होऊ लागली आहे.

दरम्यान, सध्या न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत आणि किती खटले निकाली निघाले. पॅनलवरच्या वकिलाला आपण किती खर्च करतो यासंदर्भात सभापती लोंढे यांनी माहिती मागितली असता न्यायालयीन विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. न्यायालयीन विभागाचे कामकाज म्हणजे अंधाळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झाली आहे, अशी खंत लोंढे यांनी व्यक्त केली. पुढील मिटींगला याचा सविस्तर अहवाल द्या, अशा सूचना दिल्या.

Ahilyanagar Municipal Corporation
Adhala Dam Water: आढाळा धरणाचे पहिले आवर्तन सुरू; पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

महिलांसाठी ओपन जिम बसविण्याचा प्रस्ताव अत्यंत कौतुकास्पद आहे. परंतु, ओपन जिमचे साहित्य बसविल्यानंतर त्याची मेंटेनन्सची जबाबदारी निश्चित करा, अशी सूचना नगरसेवक निखील वारे, बाबासाहेब वाकळे, सुरेश बनसोडे यांनी केली. दरम्यान, खासगी टँकरने पाणीपुरवठा करणे, मोकाट कुत्र्याच्या निवारा गृहासंदर्भातील दोन विषय स्थगित ठेवण्यात आले.

पाण्याची नासाडी करणाऱ्यावर गुन्हे नोंदवा

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयाने पाण्याची नासाडी करणाऱ्या किती लोकांवर कारवाई केली असा प्रश्न माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला. त्यात मुकुंदनगर परिसरात अत्यंत कमी कारवाई झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आले. यापुढे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशाही सूचना नगरसेवकांनी मांडल्या.

अल्कोमीटर खरेदी करा

महापालिका अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करते. त्यातील अनेक चालक मद्य प्रशान करून टँकर चावतात. त्यामुळे अशा लोकांची तपासणी करण्यासाठी ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी अल्कोमीटर मशीन खरेदी करा. संबंधित लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना टँकर चालविण्यासाठी द्या. मद्यपी टँकर चालकाच्या चुकीमुळे एका युवकाला जीव गमवावा लागला, अशी खंत नगरसेवक वारे यांनी व्यक्त केली.

Ahilyanagar Municipal Corporation
Jamkhed Ujani Water Project: जामखेडकरांना उजनीचे पाणी मिळण्यासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा!

क्यूआर कोडमध्ये मोठा घोटाळा

घनकचरा विभागामार्फत शहरात प्रत्येक घराला क्यूआरकोड ढकविण्यात आले आहे. त्यावरून घंटागाडीचे लोकेशन मिळते. तसेच, सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालक क्यूआरकाडे स्काॅन करून लोकेशन टाकतात. मात्र, याचा वापर होताना दिसत नाही. त्यातून मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप नगरसेवक वारे यांनी केला. त्यावर घनकचरा अधिकारी प्रशांत रामदिन यांनी क्यूआरकोड स्कॅनिंगचे महिन्याला साधारण दीड लाख रुपये महापालिका संबंधित यंत्रणेला देत असल्याचे सांगितले. त्यामुळे हा महापालिकेचा मोठा तोटा असल्याचेही सभेत उघड झाले.

मनपाने सीसीटीव्ही बसवावे

सध्या शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून महापालिकेने चौका चौकात सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर सभापती लोंढे यांनी सीसीटीव्ही बसविणे संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून सीसीटीव्ही बसवण्यास प्रयत्न करू. महापालिकेने सीसीटीव्ही बसवावे.

विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी?

माळीवाडा वेशीचेजवळ सर्वत्र विद्रूपीकरण सुरू आहे. माळीवाडा वेस नेमकी कोणाच्या मालकीची आहे महापालिकेच्या मालकीची असल्यास स्वच्छता राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, सर्वत्र वास्तूचे विद्रूपीकरण होत आहे, असा प्रश्न नगरसेवक निखील वारे यांनी उपस्थित केला. त्यावर घनकचरा विभागाने थातूरमातूर उत्तर दिल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर यापुढे फौजदारी कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.