Kerosene Alternative Gas Shortage: गॅस टंचाईवर केरोसीन पर्याय; अहिल्यानगरमध्ये स्टोव्हचा तुटवडा

आठ तालुक्यांत स्टोव्ह उपलब्ध नाहीत; प्रशासनाचा अहवाल शासनाकडे, केरोसीन दरावरही प्रश्नचिन्ह
Kerosene Stove
Kerosene StovePudhari
Published on
Updated on

नगर: घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने केरोसीन हा पर्याय हाती घेतला. मात्र, जिल्ह्यातील बाजारात स्टोव्ह आणि इतर तत्सम उपकरणे पुरेसा प्रमाणात उपलब्ध नाहीत. आठ तालुक्यांमध्ये स्टोव्हची उपलब्धताच नसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. केरोसीन रास्त दरात उपलब्ध झाल्यास लाभार्थी घेण्यास तयार असल्याचेदेखील अहवाल नमूद करण्यात आले.

Kerosene Stove
Popatrao Pawar Clarification: पोपटराव पवार यांचे स्पष्टीकरण; भोंदू खरातशी धार्मिक कामापुरताच संबंध

आखाती देशांत गेल्या काही दिवसांपासून युध्दजन्य परिस्थिती सुरु असल्यामुळे राज्यभरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत सध्यातरी शासनाने घरगुती सिलिंडरला प्राधान्य दिले आहे. घरगुती सिलिंडरचीही टंचाई निर्माण झाल्यास त्यावर केरोसीनचा (रॉकेल) पर्याय म्हणून वापर करण्याचा शासनाचा विचार आहे.

Kerosene Stove
Maharashtra Fake Marriage Fraud Gang: कोपरगावात बनावट लग्नातून लाखोंची फसवणूक; नवरी पळून जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 30 लाख लिटरची मागणी शासनाकडे केलेली आहे. शासनाकडे प्रस्ताव गेल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील बाजारात किती स्वयंपाकी स्टोव्ह उपलब्ध आहेत. याबाबतचा सर्व्हे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पुरवठा विभागाचे कर्मचारी आदींनी बाजारात सर्व्हे केला असता सध्यातरी बाजारात पुरेसे स्टोव्ह उपलब्ध नाही.

Kerosene Stove
Nevasa Sub Registrar Scam: नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचे आरोप

याशिवाय शेवगाव, पाथर्डी, कर्जत, नेवासा, अकोले, श्रीरामपूर, श्रीगोंदा, कोपरगाव या आठ तालुक्यांत स्टोव्हची उपलब्धता नसल्याचे तहसीलदारांचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेला आहे. एकंदरीत केरोसीन वापरासाठी सध्यातरी स्टोव्हचा वानवा असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. याबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Kerosene Stove
Pune Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वादात; मार्ग बदलामुळे आंदोलन

लिटरला मोजावे लागणार 60 रुपये

रेशनकार्डवर रास्त दरात केरोसीन मिळत होते. त्यावेळी काही घरांत स्टोव्ह उपलब्ध होते. गेल्या दहा वर्षांपूर्वीच जिल्हा केरोसीनमुक्त झालेला आहे. त्यामुळे घराघरांतील स्टोव्ह केव्हाच अडगळीला पडलेले आहेत. आता शासनाकडून उपलब्ध होणारे केरोसीन 60 रुपये लिटरने मिळणार आहे. मात्र, ते रास्त दरात उपलब्ध व्हावे अशी जनतेची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news