Ahilyanagar HSC Exam 2026: अहिल्यानगर जिल्ह्यात बारावीचा इंग्रजी पेपर; बहुतांश ठिकाणी कॉपीमुक्त यशस्वी परीक्षा

116 केंद्रांवर परीक्षा सुरू; 61,319 विद्यार्थ्यांची उपस्थिती, केवळ 9 कॉपी केसेस नोंदविल्या
Ahilyanagar HSC Exam
Ahilyanagar HSC ExamPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यातील 116 केंद्रांवर काल मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. 1143 परीक्षार्थींनी या पेपरकडे पाठ फिरवली. तर शेवगाव, पाथर्डीच्या नऊ केसेस वगळता अन्य 12 तालुक्यात एकही कॉपीकेस आढळली नाही. त्यामुळे कॉपीमुक्तीची ‌‘प्रेरणा‌’ देणारी ही वाटचाल असल्याचे बोलले जाते.

Ahilyanagar HSC Exam
Nevasa Gonegav Road Potholes: नेवासा–गोणेगाव रस्ता खड्ड्यांनी भरलेला; ग्रामस्थांचा दुरुस्तीचा इशारा

बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिला पेपर इंग़्रजीचा असल्याने काही परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव होताच, मात्र तितकीच पेपर देण्याची आतुरताही दिसत होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदींसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदींचे बैठे पथके परीक्षा केंद्रांवर तैनात होती. पुरेसा पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

Ahilyanagar HSC Exam
Deulgav Siddhi Suspicious Death Case: देऊळगाव सिद्धीत पिकअप धडकेत मृत्यू संशयास्पद; एलसीबी तपासाची मागणी

याशिवाय ड्रोन, सीसीटीव्हीचीही परीक्षा केंद्रांवर नजर होती. जिल्ह्यातील प्रतिभावंत व्यक्तींच्या ‌‘प्रेरणा‌’ संदेशच्या माध्यमातून परीक्षार्थींना आनंदात व कॉपीमुक्त वातावरणात पेपर देण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

Ahilyanagar HSC Exam
Krushiparva Agriculture Festival: ‘कृषीपर्व’ कृषी महोत्सवाचा समारोप; पाच दिवसांत 3 कोटी 42 लाखांची उलाढाल

परिणामी, काल 62246 परीक्षार्थीपैकी 61319 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. तर 1143 परीक्षार्थी मात्र गैरहजर असल्याचे आकडेवारीतून समोर आले. तसेच शेवगावात दोन, तर पाथर्डीत सात कॉपी केसेस झाल्या. ही दोन केंद्र वगळून इतर 12 तालुक्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात पहिले यशस्वी पाऊल पडल्याचे दिसले.

Ahilyanagar HSC Exam
Akole Gram Sabha Issue: अकोले तालुक्यात 39 गावांत ग्रामसभा न झाल्याचा प्रकार उघड

61310 परीक्षार्थींनी दिली कॉपीमुक्त परीक्षा

बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर 61 हजार 319 परीक्षार्थींनी दिला. इंग्रजी विषयाचे दडपण, अभ्यास झालेला नसणे, शिक्षकांनी पुरेशी तयारी करून न घेणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नऊ विद्यार्थ्यांना कॉपीचा आधार घ्यावा लागला. दोन केंद्रावरील कॉपीकेस वगळता उवर्रीत 114 केंद्रांवर झालेली कॉपीमुक्त परीक्षा हे मोठे यश समजले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news