Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगरमध्ये 41°C तापमान; उष्णतेच्या लाटेचा जनजीवनावर परिणाम

दुपारी रस्ते ओस, नागरिक उकाड्याने त्रस्त; जिल्हाभर उष्णतेचा वाढता प्रभाव
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. सोमवारी (दि. 27) सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. उन्हाच्या कडक झळानी नागरिकांची दिवसभर होरपळ सुरु होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी 41अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Heatwave
Shrirampur Baba Assault: श्रीरामपूरमध्ये भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार; प्रसादातून गुंगी देत अत्याचार

रविवारी (दि.26) तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास होता. सोमवारी (दि.27) मात्र, उष्णतेने कहरच केला. सकाळी आठ वाजल्यापासूनच जोरदार चटके बसण्यास प्रारंभ झाला. दुपारी बारानंतर मात्र, उन्हाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यत जिल्हाभरातील तापमान सरासरी 41 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले.

Heatwave
Ashok Kharat: ‘समता’ पतसंस्थेवर सहकार विभागाचा शिक्का; KYC चौकशी सुरू

या कालावधीत नगर शहरातील रस्ते ओस पडले होते. बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या होत्या. नेवासा तालुक्यात तापमानाचा पारा 41 तर राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, राहाता आदी तालुक्यांतील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. या उन्हाच्या तडाख्यात घरादारांतील पखे गरम हवा सोडत होते.

Heatwave
Nevasa IPL Betting: नेवासा तालुक्यात आयपीएल सट्टेबाजीचे जाळे; तरुणांचे भविष्य धोक्यात

त्यामुळे घरादारांत थांबलेल्या आबालवृध्दांचीदेखील होरपळ सुरुच होती. दुपारच्या भरात सूर्याच्या तीव्र झळांनी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. त्यामुळे रसवंतीगृह, शितपेये दुकाने गर्दीने फुलून गेली. सायंकाळी उशीरापर्यंत उन्हाचे चटके सुरुच होते. सूर्य मावळल्यानंतर हवामानात उकाडा वाढला. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले.

Heatwave
Ahilyanagar Revenue Reforms: महसूल कायद्यात बदल; नागरिकांना जलद न्याय देणार – बावनकुळे

तापमान अंश सेल्सिअस

अहिल्यानगर 40, राहुरी 41, नेवासा 42, कोपरगाव 41, शेवगाव 41, पाथर्डी 40, कर्जत 41, श्रीरामपूर 41, संगमनेर 40, राहाता 41, अकोले 39, पारनेर 39, श्रीगोंदा 41, जामखेड 40.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news