Ahilyanagar Crime: दारूच्या व्यसनावरून मुलाला मारहाण; दोन दिवसांनी मृत्यू, आई-वडिलांकडून मृतदेह जाळला

अहिल्यानगरच्या गुणवडीतील धक्कादायक घटना; सुरतस्थित भावाच्या माहितीवरून आई-वडिलांना अटक
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्‍या मुलाला उपचाराविना घरातच ठेवले. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांनी त्याचा मृतदेह पहाटेच घरापासून चार किलोमीटरवर शेतात नेऊन जाळून टाकला. अहिल्यानगर तालुक्यातील गुणवडी शिवारात रविवारी (दि.४) सकाळी ही घटना उघडकीस आली.

Crime News
District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत आज उमेदवारी अर्जांचा पाऊस; विस्थापित आज खोलणार पत्ते?

प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या सुरत येथे राहणाऱ्या भावानेच दिलेल्या माहितीनंतर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडील प्रकाश विनायक लांडगे आणि आई आशा (रा. गुणवडी) यांना अटक केली.

Crime News
Sujay Vikhe Patil: जिल्हा बँकेची निवडणूक लादली तर पूर्ण ताकदीने लढू: सुजय विखे

सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे यांनी याबाबत माहिती दिली. दारूचे व्यसन असलेला प्रवीण मूकबधिर होता. तो आई-वडिलांसोबतच राहत होता. दारूच्या व्यसनावरून त्‍याचे वारंवार आई-वडिलांशी वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच प्रवीण दारू पिऊन घरी आला, तेव्हा त्याचा पुन्हा आई-वडिलांशी वाद झाला.

Crime News
Nashik Pune Semi High Speed Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरात जागरण गोंधळ; काकोडकर समितीची मुदत संपली

त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. वडिलांनी दांडक्याने केलेल्या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला रुग्णालयात न नेता घरातच ठेवण्यात आले. जखमी प्रवीणचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मृत्‍यूची माहिती कोणालाही न देता पहाटेच मृतदेह सुमारे चार किलोमीटरवर स्वत:च्या शेतात नेऊन जाळून टाकला.

Crime News
Kopardi Case: कोपर्डी प्रकरणाला नवा टप्पा; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

दरम्यान, रविवारी (दि. ४) सकाळी तालुका पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि प्रवीणच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news