Ahilyanagar Firing Incident: अहिल्यानगर हादरला! टोळीयुद्ध व निवडणूक वादातून दोन ठिकाणी गोळीबार; एकाचा मृत्यू

घोडेगावात हॉस्पिटलसमोर शूटआऊट, शहरात मध्यरात्री तरुणावर गोळ्या; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

नगर: टोळीयुद्धातूनव गोळीबाराच्या दोन घटनांनी जिल्हा गुरुवारी हादरला. त्यात घोडेगाव (ता. नेवासा) येथे दोन टोळ्यांतील दोघांनी परस्परांवर गोळीबार केल्याचे समजते त्यात एक जण ठार झाला असून, दुसऱ्या टोळीतील एक जण गंभीर जखणी झाला आहे. दुसऱ्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमारास अहिल्यानगर शहरात कोठला परिसरात महापालिका निवडणुकीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. हा तरुणही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते.

Guns
Pathardi HSC Exam Malpractice: पाथर्डीत बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सात कॉपीबहाद्दर पकडले

घोडेगाव (ता नेवासा) येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टोळीयुद्धातून दोन जणांनी परस्परांवर गोळीबार केला. घोडेगाव येथील घोडेश्वरी रुग्णालयासमोर हे शूटआऊट झाले. टोळीयुद्धातून झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण घोडेगाव हादरले. त्यात हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या नितीन शिरसाठ याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दुसऱ्या टोळीतील सूरज फुलमाळी व अन्य एकाने बेछूट गोळीबार केला. त्याच वेळी नितीन शिरसाठ यानेही उत्तरादाखल गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ व फुलमाली यांना तातडीने अहिल्यानगर येथे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शिरसाठचा मृत्यू झाला. फुलमाळी याला पुण्याला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Guns
Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival: श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाचा धर्मध्वज पूजनाने प्रारंभ

गोळीबाराच्या घटनेने व्यापारी व ग्रामस्थ भयभीत झाले व सगळीकडे पळापळ झाली. गोळीबाराची घटना समजतात सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनीही घटनास्थळी पाहणी केली. घोडेगावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे. सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अंमळनेर येथे दोन दिवसांपूर्वी रोहित दरंदले याच्यावर दोघांनी गोळीबार केला होता.

Guns
Kopargaon Sanjeevani Par: संजीवनी पार नव्या तेजात उजळला; महाशिवरात्रीला लोकार्पण सोहळा

महापालिका निवडणुकीत मुकुंदनगर येथे दोन गटांत हाणामारी झाली होती. त्याच वादातून बुधवारी रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारास कोठला येथे एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद जैद रशीद उर्फ टैप्प्या, जाबीर सादीक सय्यद उर्फ जाबू, अफजल आसीर शेख, अस्लम असीर शेख, अल्ताफ शेख (सर्व रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी अबरार मुक्तार शेख (वय 24, रा. आलमगीर, अहिल्यानगर) याने पोलिसांत फिर्याद दिली.

Guns
Ahilyanagar Police Recruitment 2026: अहिल्यानगर पोलिस भरतीला प्रारंभ; पहिल्याच दिवशी 503 उमेदवार पात्र

11 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी अब्रार शेख हा मित्रासह दुचाकीवरून जुन्या बसस्थानक परिसरात गेला होता. यावेळी आरोपी जैद सय्यद उर्फ टायप्या, जाकीर सादिक सय्यद उर्फ जाबू आणि एका अनोळखी व्यक्तीने रिक्षामधून त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींच्या हातात बंदूक पाहून फिर्यादीने राज चेंबरच्या दिशेने पळ काढला, मात्र आरोपींनी पाठलाग केला. राज चेंबरजवळ आरोपी जैद सय्यद याने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी अब्रारच्या कमरेला लागली व तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला त्याच्या मित्राने जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात हलविले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस पथकाने जाकीर सादिक सय्यद याला रिक्षासह ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी जैद सय्यद फरार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news