Pathardi HSC Exam Malpractice: पाथर्डीत बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सात कॉपीबहाद्दर पकडले

कडेकोट बंदोबस्त असूनही तीन केंद्रांवर गैरप्रकार; शिक्षण विभागात खळबळ
Exam Malpractice
Exam MalpracticePudhari
Published on
Updated on

पाथर्डी: बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर सात कॉपी बहाद्दरांना तहसीलदारांच्या पथकाने पकडले. दक्षता पथके नेमली असतानाही ही घटना घडल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Exam Malpractice
Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival: श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाचा धर्मध्वज पूजनाने प्रारंभ

मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील 13 केंद्रांवर एकूण 5064 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी गटविकास अधिकारी यांची आठ भरारी पथके, तहसीलदारांचे प्रत्येक केंद्रावर 10 जणांचे बैठे पथक, तसेच जिल्हा प्रशासनाकडून संवेदनशील दहा केंद्रांवर स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. एवढ्या कडेकोट बंदोबस्तातही सात विद्यार्थी कॉपी करताना आढळून येणे हे विशेष मानले जात आहे.

Exam Malpractice
Kopargaon Sanjeevani Par: संजीवनी पार नव्या तेजात उजळला; महाशिवरात्रीला लोकार्पण सोहळा

तालुक्यातील खरवंडी येथील भगवान बाबा विद्यालयात एक, कोरडगाव येथील हरिहरेश्वर विद्यालयात दोन, तर तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा विद्यालयात चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना तहसीलदारांच्या पथकाने पकडले.

Exam Malpractice
Ahilyanagar Police Recruitment 2026: अहिल्यानगर पोलिस भरतीला प्रारंभ; पहिल्याच दिवशी 503 उमेदवार पात्र

दरम्यान, प्रभू पिंप्री येथील परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी बसल्याची माहिती असल्याचा फोन पुणे बोर्डाकडे करण्यात आला होता. त्यानंतर भरारी पथक व स्थानिक यंत्रणांनी केंद्रावर सखोल तपासणी केली. मात्र, तपासणीअंती कोणताही डमी विद्यार्थी आढळून आला नसल्याची माहिती केंद्र संचालक अर्जुन वारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, या संदर्भातील अधिकृत अहवाल सायंकाळपर्यंत परिरक्षकांकडे प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती रामनाथ कराड यांनी दिली.

Exam Malpractice
Ahilyanagar Nutrition Food Seizure: केडगावमध्ये 7,500 पोषण आहार पाकिटांचा साठा जप्त; विभागांनी झटकले हात

याच दरम्यान मोहटा येथील परीक्षा केंद्रावर दगडफेक झाली असून काही व्यक्ती केंद्रात शिरल्याचा खोटा फोन गटशिक्षणाधिकाऱ्यांना आला. यावर तातडीने हालचाली करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्ष पाहणीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news