Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival: श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव येथे महाशिवरात्री उत्सवाचा धर्मध्वज पूजनाने प्रारंभ

संत-महंतांच्या उपस्थितीत ध्वजारोहण; लेझिम, सैनिकी बँड व भक्तांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण
Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival
Trivenishwar Mahadev Mahashivratri FestivalPudhari
Published on
Updated on

नेवासा: तालुक्यातील हंडीनिमगाव व सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाला संत महंतासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजनाद्वारे ध्वजारोहण करून भक्तिमय वातावरणात बुधवारी (दि.11) प्रारंभ करण्यात आला. हर हर महादेव,त्रिवेणीश्वर भगवान की जयअशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival
Kopargaon Sanjeevani Par: संजीवनी पार नव्या तेजात उजळला; महाशिवरात्रीला लोकार्पण सोहळा

यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संत महंतांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मिरवणुकीत उस्थळ दुमाला येथील किसनगिरी बाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझिम व झांजपथक त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचे सैनिकी बँड पथक, झांज पथक सहभागी झाले होते. डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या बालिका व महादेव पार्वतीची वेशभूषा केलेले बालके मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival
Ahilyanagar Police Recruitment 2026: अहिल्यानगर पोलिस भरतीला प्रारंभ; पहिल्याच दिवशी 503 उमेदवार पात्र

मिरवणुकीचा समारोप त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात झाल्यानंतर मंदिर प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत हभप देवीदास महाराज म्हस्के, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते व रामनाथ महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्याचे पौरोहित्य गणेश कुलकर्णी यांनी केले.

Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival
Ahilyanagar Nutrition Food Seizure: केडगावमध्ये 7,500 पोषण आहार पाकिटांचा साठा जप्त; विभागांनी झटकले हात

रमेशानंदगिरी महाराज यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व महंत देवीदास महाराज म्हस्के शास्त्री यांनी अजानबाहू योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज व त्रिवेणीश्वरचा महिमा विषद करून सोहळयाला आशीर्वाद दिले.

Trivenishwar Mahadev Mahashivratri Festival
Shrirampur School Case: दुसरीत शिकणाऱ्या 4 विद्यार्थिनींचा विनयभंग, श्रीरामपुरातील मराठी शाळेत शिक्षकाचं कृत्य; राज्यात संताप

यावेळी प्रल्हादगिरी बाबांच्या नवीन मूर्तीसाठी देणगी देणारे दत्तात्रय पिसाळ, विजय देशमुख यांचा तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा स्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश उभेदळ यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news