Ahilyanagar DJ Ban: अहिल्यानगरात गणेशोत्सव-नवरात्रोत्सवात डीजे बंदी! भाड्याने देण्यावरही प्रशासनाचा बडगा

१४ सप्टेंबरपासून आदेश लागू; डीजेचा वापर, भाड्याने पुरवठा आणि उपलब्ध करून देण्यास बंदी
DJ
DJ Pudhari
Published on
Updated on

नगर: गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात डीजे बंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी (दि. १२) काढण्यात आला. डॉल्बी सिस्टम मालक व चालक यांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार बंदीचा आदेश अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जारी केला आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे तंबी आदेशात देण्यात आली आहे.

DJ
Ahilyanagar Drought: अहिल्यानगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! ६९२ पाझर तलाव कोरडे; ४१ हजार हेक्टर खरीप धोक्यात

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे. गणेश विजर्सन मिरवणुकीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून डीजेचा दणदणाट केला जातो. त्याच्या आवाजामुळे वयोवृद्ध आजारी आणि लहान मुलांना त्रास होतो. पर्यावरण कायदा कलम आठ प्रमाणे नोटिस देवून बैठकीत समुपदेशन करूनही डीजे बंदीवर परिणाम होत नाही.

DJ
Ahilyanagar Police: गणेशोत्सवासाठी अहिल्यानगर पोलिसांचा कडक बंदोबस्त! ४९२ जण दोन दिवस हद्दपार

डीजे सिस्टम मालक व चालक मिरवणुकांमध्ये डीजे लावून पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करतात त्यातून सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमनाचे आदेश पारीत केले आहेत. त्या आदेशाच्या पालनावरून प्रशासन व मंडळ पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्या संघर्ष होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

DJ
Ahilyanagar Rain: बाप्पाच्या आगमनाआधी अहिल्यानगरात पावसाची हजेरी!

सार्वजनिक शांतता भंग होणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे व मानवी आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खात्री झाल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) प्राप्त अधिकाराचा वापर करून ही बंदी घालण्यात आली आहे. सोमवार (दि.१४) पासून हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

DJ
Ahilyanagar Rain Forecast: महिनाभर पाऊस गायब, आता तीन दिवस बरसणार! १२ ते १४ सप्टेंबरला पावसाचा अंदाज

सोलापूरच्या डीजे बंदीनंतर पुण्यातही डीजे बंदीवरून घमासान सुरू आहे. नागपुरात पोलिस प्रशासनाने बंदीचा फतवा काढला आहे. अहिल्यानगरात मात्र डीजे भाडोत्री देण्याला चालक- मालकांना बंदी करण्यात आली आहे.

बंदी आदेशात डीजे चालक व मालकांना उपकरणाचा वापर, भाड्याने पुरवठा, उपलब्ध करून देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांकडे स्वतःची डीजे सिस्टम नाही. ते भाडोत्री सिस्टम घेऊन दणदणाट करतात. आता सिस्टम भाडोत्री देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news